Monday, October 29, 2018

सांगली, मिरजेतील सात नामांकित हॉटेलवर छाप


सांगली,(प्रतिनिधी)-
 अन्न व औषध प्रशासनाच्या विशेष पथकाने सोमवारी सांगली- मिरजेतील सात नामांकित हॉटेल्स्वर छापे टाकले. तेथील अन्नाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे. त्या अहवालानंतर कारवाई केली जाईल, अशी माहिती सहायक आयुक्त सुकुमार चौगुले यांनी दिली.
गणेश नाष्टा सेंटर, सांगली जिमखाना रेस्टॉरंट, हॉटेल विहार, हळद भवन नाष्टा सेंटर, बसस्थानक चौकातील द्वारका स्वीट बेकर्स अँड केक शॉप, तर मिरजेतील हॉटेल अयोध्या (वंटमुरे कॉर्नर), हॉटेल सुखसागर, अवनि पार्क अशा सात हॉटेल्सवर छापा टाकण्यात आला. आझाद चौकातील प्रख्यात हॉटेल नवरत्न दोन दिवसांपूर्वी अन्नात किडे आढळले. सजग ग्राहकाने ते प्रकरण उघड केले. ’अन्न-औषधकडे तक्रार केल्यानंतर झाडाझडती घेण्यात आली. किचनमध्ये जाळ्या, किडे, झुरळे आढळली. हॉटेलचा परवाना निलंबित करण्यातआला. त्यानंतर अन्न व औषध प्रशासन खडबडुन जागे झाले आहे. शहरातील अन्न सुरक्षेसाठी विशेष पथक तयार केले आहे. फास्ट फूड गाड्यांसह हॉटेल्स्वर शहरासह जिल्हाभर छापामारीचे सत्र सुरू झाले आहे.
चायनिज गाडे, भेळ-पाणीपुरीसह फास्ट फूड गाड्या, हॉटेलवर आता नजर ठेवली जाणार आहे. सांगली-मिरजेतील सात हॉटेल्सवर छापे मारण्यात आले असून तेथील अन्नाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. अहवालानंतर कारवाई केली जाईल. आठ हॉटेल्स-नाष्टा सेंटरवर छाप्यादरम्यान अनेक त्रुटी पथकास आढळून आल्या. किचनमध्ये अस्वच्छता, ड्रेनेजची व्यवस्था नाही, कर्मचार्यांना अॅप्रन-टोप्या नाहीत, कर्मचार्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र नाही, अशा अनेक त्रुटी आढळल्याचे सहायक आयुक्त सुकुमार चौगुले यांनी सांगितले. अन्न सुरक्षेशी खेळ करणार्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

No comments:

Post a Comment