Tuesday, October 23, 2018

अंगणवाडी सेविकांना दोन हजार रुपये भाऊबीज


सांगली जिल्ह्यातल्या 5252 सेविकांना लाभ
जत,(प्रतिनिधी)-
राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांची दिवाळी राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी गोड केली आहे. यंदा दिवाळी भेट म्हणून प्रत्येकी दोन हजार रुपये भाऊबीज मंजूर झाली असून लवकरच त्यांच्या बँक खात्यात ही भेट जमा होणार आहे. सुमारे 2 लाख 7 हजार 961 अंगणवाडी सेविकांना ही भेट मिळणार आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत असणार्या 97 हजार 475 अंगणवाडी सेविका, 97 हजार 475 अंगणवाडी मदतनीस व 13 हजार 11 मिनी अंगणवाडी सेविका, अशा एकूण दोन लाख सात हजार 961 मानधनी कर्मचार्यांना ही भेट मिळेल.  सांगली जिल्ह्यात अंगणवाडी सेविका 2484 आहेत. तर  मिनी अंगणवाडी सेविका 436 आहेत. मदतनीसांची संख्या 2332 आहे. असे एकूण 5252 कर्मचारी आहेत. या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मिळणारी एकूण रक्कम 1 कोटी 5 लाख 4 हजार इतकी आहे.

No comments:

Post a Comment