जत,(प्रतिनिधी)-
मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासनाने शासकीय वसतिगृहांची
सोय केली आहे,मात्र या वसतिगृहांमध्ये अनेक गैरव्यवहार होत
आहेत. सांगली जिल्ह्यातल्या कुरळप येथील आश्रमशाळेत मुलींवर लैगिक
अत्याचार झाल्याचे उघडकीस आले आहे. याशिवाय अन्य गैरव्यवहारही
अशा वसतिगृहांमध्ये होत आहे. या सर्व प्रकारांची चौकशी करण्यात
यावी आणि दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
पुणे जिल्ह्यात अशा प्रकारची चौकशी सुरू आहे. या ठिकाणी पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकार्यांनी दिले असताना यंत्रणेद्वारे अनेक ठिकाणी बंद पडलेल्या शाळा, मोठ्या शैक्षणिक संकुले यांची पाहणी केली जात असून त्याची माहिती गोळा करण्याचे
काम सुरू आहे. अशी चौकशी करण्याचे आदेश सांगलीच्या जिल्हाधिकार्यांनी द्यावेत, अशी मागणी होत आहे. शासकीय वसतिगृहांवर विद्यार्थ्यांना
होणारा त्रास, तसेच गैरसोय होणार नाही याबाबत दक्षता घेण्यासाठी
समिती बनवून वसतिगृहांची तपासणी कऱण्याचे आदेश द्यावेत. या समितीने
शासकीय वसतिगृहातील निवास व्यवस्था, भोजन, पाणीपुरवठा, शैक्षणिक सुविधा आदिंची पाहणी करावी.
खाजगी इमारतीमध्ये कार्यान्वित असलेली शासकीय वसतिगृहे, शासकीय जागेत सध्या कार्यान्वित आहेत जी शासकीय जागेत स्थलांतरित करण्यासारखी
आहेत, त्यासाठी किती जमीन लागेल, शासनाकडे
किती जमीन उपलब्ध आहे, याची माहिती देखील अहवालात नमूद करण्यात
यावी.
No comments:
Post a Comment