Saturday, October 27, 2018

दिवाळीत 5 दिवस बँका राहणार बंद


जत,(प्रतिनिधी)-
पुढील महिन्यात म्हणजे नोव्हेंबरमध्ये बँकाना तब्बल 11 दिवस सुट्टी आहे. त्यात दिवाळीला सलग पाच दिवस सुट्टी आहे. त्यामुळे दिवस सुट्टी असल्याने नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. बुधवारी 7 नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन, गुरुवारी 8 नोव्हेंबर रोजी दिवाळी पाडवा आणि त्यानंतर शुक्रवारी 9 तासखेला भाऊबीज असल्याने बँका बंद असतील. 10 तारखेला दुसरा शनिवार असल्याने बँकेला सुट्टी आहे. त्यानंतर 11 नोव्हेंबरला रविवार असल्याने पुन्हा बँका बंद असतील.
त्यामुळे तुमची काही महत्त्वाची कामे असल्यास ती आताच करुन घ्यावीत. अन्यथा दिवाळीनंतर बँकांमध्ये एकच गर्दी होण्याची शक्यता आहे. 5 दिवस सलग सुटी होऊन लोकांची चांगलीच तारांबळ होऊ शकते. दरम्यान बँकांना सलग 5 दिवस सुट्टी असल्याने एटीएममध्येही खडखडाट होऊ शकतो. यामुळे एटीएममधूनही वेळीच काढून ठेवायला हवेत असे सांगण्यात येत आहे. वैद्यकीय किंवा इतर तातडीच्या खर्चांसाठी लागणारे पैशांची आधीच तजवीज केल्यास ऐन दिवाळीच तुम्हाला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागणार नाही. दिवाळीत ट्रीपला जाणार्यांची संख्याही जास्त असते. बाहेरगावी गेल्यावर लागतील तसे एटीएममधून पैसे काढू असे आपण म्हणतो. पण दिवाळीमुळे बँकांना असलेल्या सुट्ट्या लक्षात घेता असे करणे अडचणीचे ठरु शकते.

No comments:

Post a Comment