जत,(प्रतिनिधी)-
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी
मिळणार्या खाद्यपदार्थांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये याची काळजी घेत अन्न आणि औषध प्रशासन संशयित ठिकाणी कारवाईला
सुरुवात केली आहे. जतमधील एका किराणा दुकानातून एक लाख तीस हजारांचा
खाद्यतेल साठा जप्त करण्यात आला आहे. तसेच सांगलीतील कुपवाड एआमयडीसीत
एका फ्लोअर्स मीलमधून सहा लाखाचा रवा, मैदा आणि आटा साठा जप्त
करण्यात आला असल्याची माहिती अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त सुकुमार चौगुले यांनी
पत्रकारांना दिली आहे.
कुपवाड एमआयडीसीत सांगली रोलर अँड फ्लोअर्स मिलमध्ये
अस्वच्छता असल्याचे समोर येताच अन्न सुरक्षा अधिकारी पी. पी. फावडे यांनी कारवाईला सुरुवात केली. रवा, मैदा आणि आटा याबाबतीत लेबलिंग करताना योग्य काळजी
घेतली जात नाही. संबंधित पदार्थ ठेवण्याची जागा स्वच्छ नसल्याचेही
समोर आले. त्या ठिकाणी उत्पादित करण्यात येत असलेल्या रवा,
मैदा आणि आटा यामध्ये भेसळ असल्याचा संशय असल्याने नमुनेुपवाड एमआयडीसीतील
सांगली फ्लोअर मिलवर छापा तपासणीसाठी घेण्यात आल्याची माहिती चौगुले यांनी दिली.
जतमध्ये बनशंकरी ट्रेडर्स या किराणा दुकानात विकल्या जाणार्या पाम खाद्यतेलाबाबत संशय आल्याने त्या विभागाचे अन्नसुरक्षा अधिकारी सतीश
हाके यांच्या पथकाने कारवाई केली आहे. एक लाख तीस हजार रुपये
किमतीचे पामतेल जप्त केले. पामतेलाच्या पॅकिंगवर चुकीचे लेबल
लावले जात असल्याने त्यामध्ये भेसळ असण्याची शक्यता असल्याचे अधिकार्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment