जत,(प्रतिनिधी)-
दहावी व बारावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खासगीरित्या
फॉर्म क्रमांक 17 भरण्याच्या अर्जास मुदतवाढ देण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांना 10 व 12वी
परीक्षेसाठी आता 6 नोव्हेंबरपर्यत अर्ज करता येईल, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाकडून सांगण्यात आले आहे.
फेब्रुवारी-मार्च 2019 मध्ये होणार्या दहावी
व बारावी परीक्षेस खासगीरित्या प्रविष्ट होणार्या विद्यार्थ्यांसाठी
नियमित शुल्काने नावनोंदणी अर्ज (फॉर्म क्रमांक 17) ऑनलाइन प्रक्रियेद्वारे स्वीकारण्याची यापूर्वीची तारिख 19 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर अशी होती. मंडळाने दहावी व बारावी परीक्षेसाठी खासगी विद्यार्थ्यांना विलंब शुल्क आकारून
अर्ज करण्याची सुविधा 26 ऑक्टोबरपासून उपलब्ध करून दिली असून,
6 नोव्हेबरपर्यंत अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे. विद्यार्थ्यांनी संकेतस्थळाचा वापर करावा. अर्ज भरण्यासाठी
सूचना संकेतस्थळावर मराठी व इंग्रजीमधून उपलब्ध आहेत. यापूर्वी
ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरूनही नोंदणी शुल्क जमा न केलेल्या विद्यार्थ्यांनी नव्याने
ऑनलाइन अर्ज भरून सर्व विहित प्रक्रिया करणे अनिवार्य राहणार आहे.
No comments:
Post a Comment