जत,(प्रतिनिधी)-
जत येथील
पशुवैद्यकीय दवाखाना व पशुधन विकास सेवाभावी संस्था जत यांच्या संयुक्त विद्यमाने जत
शहरातील प्रभाग क्रमांक एक मध्ये जंतनिर्मूलन शिबीर घेण्यात आले. शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. या शिबिराचे उद्घाटन
रासपचे माजी जिल्हाध्यक्ष अजित पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी
तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. जवणे, पशुधन
विकास सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष भीमराव देवकर, उपाध्यक्ष श्रीधर
वाघमारे, सचिव डॉ. प्रवीण वाघमोडे,
जोत्याप्पा बेळुंखी, विनायक बेळुंखी यांची प्रमुख
उपस्थिती होती. या शिबिराचा लाभ शहरातील तंगडी मळा, विठ्ठलनगर परिसरातील शेतकरी, पशुपालक यांनी घेतला.
शिबिरामध्ये इन ऑफ टॅगिंग, अनिमल हेल्थ कार्ड,
जंतनाशक, लाळ्या खुरकतसह सर्व प्रकारांचे लसीकरण,
औषधे मोफत वाटप करण्यात आली. जत तालुक्याच्या शेजारील
मंगळवेढा, सांगोला भागात लाळ्या खुरकत रोगाने थैमान घातले आहे.
यावर लसीकरण हाच एकमेव पर्याय आहे. शहरात उपक्रम
राबवल्याबद्दल रासपचे माजी जिल्हाध्यक्ष अजित पाटील यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment