जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील दरिकोणूर येथील सदाशिव
म्हाळाप्पा व्हनमाने यांची येळवी येथून दुचाकी वाहनाला लावलेली बॅग लंपास केली. त्यात असलेले रोख दोन लाख आणि अन्य कागदपत्रेही चोरट्यांनी
नेली. ही घटना काल दुपारी अडीच-तीनच्या
सुमारास घडली. याप्रकरणी जत पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
सदाशिव व्हनमाने यांनी जतमधील बँक ऑफ
इंडियाच्या जत शाखेतून दोन लाख रुपये काढून मंगळवेढा तालुक्यातील हुन्नूरला देवदर्शनासाठी
येळवी मार्गे दुचाकीने (एमएच 03-एएस 1841) दरिकोणूरला निघाले होते. येळवी येथे बसस्थानक चौकात आल्यावर तहान लागली म्हणून आपली दुचाकी थांबवून
ते हॉटेलात गेले. पैशांची बॅग मात्र गाडीलाच होती. ते पाणी पिऊन माघारी येईपर्यंत अज्ञातांनी बॅग लांबवली होती. यात रोख दोन लाख रुपये, बँकेचे पासबूक,चेकबूक होते.
No comments:
Post a Comment