Tuesday, October 30, 2018

विविध मागण्यांसाठी ’रिपाइं’चा जत तहसील कार्यालयावर मोर्चा


जत,(प्रतिनिधी)-
   जत तालुका दुष्काळ जाहीर करा. बालगाव,बोगीॅ आदी गावांमध्ये  मागासवर्गीय  समाजावर झालेल्या अन्यायाची  चौकशी करा. दलितांच्या   जमिनी ज्यांनी बेकायदेशीरपणे बळकावल्या, त्यांची चौकशी करा. उमदी व माडग्याळ तालुके  करा. आणि जत पंचायत समितीमधील शाखा अभियंत्याची बदली करा,  अशा मागण्या घेऊन  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाजत शाखेच्या वतीने तहसील कार्यालयावर  मोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसीलदार सचिन पाटील यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
सकाळी बारा वाजता मार्केट यार्ड येथून या मोर्चाला सुरुवात झाली. मंगळवार पेठ, लोखंडी पूल, संभाजी चौक, शिवाजी पेठ या मार्गे  दुपारी दीड वाजता हा मोर्चा तहसिल कार्यालयाच्या आवारात आला.या  ठिकाणी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. मोर्चात सांगलीचे माजी महापौर विवेक कांबळे,  रिपाईचे नेते संजय कांबळे,  जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ ठोकळे, अशोक कांबळे, रुपेश शिंदे, बाळासाहेब उमाप ,  नारायण कामत, संजय पाटील, प्रशांत ऐदाळे, अरुण भाऊ, आठवले, धोंडीराम चंदनशिवे, सुभाष कांबळे, प्रभाकर नाईक, नीलेश वाघमारे, अरविंद कांबळे आदी नेते उपस्थित होते.
या मोर्चासमोर बोलताना सांगलीचे माजी महापौर विवेक कांबळे म्हणाले की,  जत तालुका हा दुष्काळी तालुका आहे या तालुक्याला गेल्या वर्षभरापासून पावसाचा पत्ता नाही त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे टँकर व ज्या ठिकाणी जनावरांना चारा छावण्यांची मागणी आहे,  त्या ठिकाणी चारा छावणी देण्याची गरज आहे तसेच जत तालुक्यातील दलितावर ती मोठ्या प्रमाणात अन्याय  होत असून तो अन्याय दूर करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे अन्यथा या मोर्चाद्वारे सूचक इशारा आम्ही देत असून यापुढे जर दलितांवर अन्याय होत असतील तर रस्त्यावर उतरून जशास तसे उत्तर देऊ असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
रिपाई नेते  संजय कांबळे म्हणाले की, जत तालुक्यातील पंचायत समितीच्या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार झाला आहे. मागासवर्गीय योजनांच्या अनेक फायली जाणून-बुजून जिल्हा परिषदेला पाठवल्या जात नाहीत. याचा अन्याय तालुक्यातील दलितावर होत असून पंचायत समिती मधील बांधकाम विभागातीलशाखा अभियंता ए. एम. शेख यांच्या कारभाराची चौकशी करून त्यांची बदली करावी अशी आमची मागणी आहे. जत तालुका हा विस्ताराने मोठा असून या तालुक्याचे विभाजन करून उमदी व माडग्याळ असे दोन तालुके करण्यात यावेत अशी आमची मागणी आहे. जत तालुक्यातील मागासवर्गीयांच्या जमिनी ज्यांनी बेकायदेशीरपणे खरेदी घेतलेला आहेत,  त्या मूळ मालकाला परत मिळाव्यात. तालुका हा गेले वर्षभर दुष्काळाच्या खाईत सापडला असून प्रशासन मात्र टँकर व चारा छावणी द्यायला तयार नाही याची दखल घेऊन येत्या आठ दिवसात मागेल त्याला टँकर व मागेल त्याला काम मिळाले पाहिजे रासप चे  माजी जिल्हाध्यक्ष अजित पाटील म्हणाले की,  रिपाईने काढलेला हा मोर्चा जनतेसाठी महत्त्वाचा असून तालुक्यात अनेक गावे दुष्काळाने होरपळून निघत आहेत 50 ते 60 टक्के लोक आता ऊसतोडीला गेले असून या तालुक्याला तातडीने दुष्काळाच्या उपाय योजना कराव्यात रिपाईने काढलेल्या मोर्चाला पाठिंबा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


No comments:

Post a Comment