Tuesday, October 30, 2018

11 लाखांच्या सुगंधी तंबाखूसह गुटखा जप्त


सांगली,(प्रतिनिधी)-
 मार्केट यार्डातील नानवाणी किराणा मालाच्या दुकानातून अकरा लाखांची सुगंधी तंबाखू, गुटखा जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि अन्न-औषध प्रशासनाने संयुक्त ही कारवाई करण्यात आली. लाजम सिकंदर मुजावर याच्या नावावर हा परवानाधारक अन्न प्रशासनाने चौकशीसाठी ताब्यात घेतला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, की मार्केट यार्डातील नानवाणी किराणा मालाच्या दुकाना सुगंधी तंबाखूसह गुटख्याचा मोठ्या प्रमाणावर साठा असल्याची माहिती एलसीबीच्या पथकास मिळाली होती. त्यानुसार पथकाने छापा टाकला. त्यावेळी तेथे मोठ्या प्रमाणावर सुगंधी तंबाखू, गुटखा मिळून आला. त्यानंतर तातडीने अन्न प्रशासनाच्या विभागास कळविण्यात आले. अन्न प्रशासनाच्या अधिकार्यांनी घटनास्थळी येवून पंचनामा केले. तेथून सुगंधी तंबाखू, विविध प्रकारचा गुटखा असा अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत जप्त केलेल्या मालाची मोजणी सुरू होती. कारवाईत एलसीबीचे निरीक्षक श्रीकांत पिंगळे, राजुक कदम, विजयकुमार पुजारी, जगु पवार, विद्यासागर पाटील, अमित परीट, युवराज पाटील, निलेश कदम, संतोष कुडचे, सुनील लोखंडे, महादेव धुमाळ, शशिकांत जाधव, अन्न प्रशासनाचे सहायक आयुक्त सुकुमार चौगुले, डी. एच. कोळी, अनिल पवार, रोहन शहा, स्मिता हिरेमठ यांचा कारवाईत सहभाग होता. या कारवाईच्या निमित्ताने धक्कादायक माहीती पुढे आली. गेल्या दोन वर्षांत याच नानवाणीच्या दुकानात वारंवार छापे टाकून गुटखा जप्त करण्यात आला. गेल्यावेळी कोट्यवधींचा गुटखा या दुकानातून जप्त करण्यात आला होता. त्यानंतरही पुन्हा राजरोजपणे जिल्हाभर विक्री केली जात होती. दुकानाचा परवाना एकाच्या नावाने चालवणारा वेगळाच असे हे मोठे कनेक्शन यानिमित्ताने पुढे आले आह.

No comments:

Post a Comment