Sunday, October 28, 2018

दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी


जत,(प्रतिनिधी)-
दिवाळीच्या खरेदीसाठी आता हळूहळू जतच्या बाजारात गर्दी वाढू लागली आहे. शेवटच्या रविवारच्या सुट्टीचा मुहूर्त साधून नागरिकांनी सहकुटुंब शहरातल्या बाजारपेठेत  गर्दी केल्याचे दिसून आले. त्यामुळे रविवार सकाळपासून मंगळवार पेठेत  नागरिकांची गर्दी दिसून येत होती.
महिलांनी कपडे, ज्वेलरी खरेदीसाठी गर्दी केली. होती. आकाशकंदील, दिवे, पणत्या, विद्युतमाळा घेण्यासाठी नागरिकांची लगबग दिसून येत होती. लहान मुलांना कपडे घेण्यासाठी बच्चेकंपनीही मोठ्या उत्साहाने खरेदी करत होती. सायंकाळनंतरही नागरिकांची कपड्यांच्या खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. रविवारच्या सुटीचा मुहूर्त साधून दिवाळीच्या खरेदीकरिता गर्दी दिसून येत होती. प्रत्येक कपड्यांच्या दुकानात गर्दी तर दिसत होती. त्याचबरोबर रस्त्यावरील दुकानातदेखील खरेदी करताना नागरिक दिसत होते. बेशिस्त वाहनचालक व पार्किंगमुळे नागरिकांना वाहूतक अडथळ्यांचा सामना करावा लागला.

No comments:

Post a Comment