Friday, March 1, 2019

पळवून नेलेल्या ट्रॅक्टरसह संशयित ताब्यात


जत,(प्रतिनिधी)-
 वाळेखिंडी (ता. जत) येथील प्रवीण पोपट शिंदे हा चोरून वाळूची वाहतूक करीत असताना त्यास जत तहसीलदारांनी पकडून जत पोलिस ठाण्याच्या आवारात ट्रॅक्टर लावला होता. त्याने तो पोलीस ठाण्याच्या आवारातून चोरून नेला होता. याबाबत जत पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. जत ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड व त्यांच्या पोलिस पथकाने वाळेखिंडी ते लपवून ठेवलेला ट्रॅक्टर आरोपीसह ताब्यात घेतला.
वाळेखिंडी ता. जत येथील प्रवीण पोपट शिंदे हा त्याचे ट्रॅक्टर मधून चोरुन वाळूची वाहतूक करीत असताना त्यास तहसीलदारांनी पकडून कारवाई करण्यासाठी ट्रॅक्टर पोलीस ठाण्याच्या आवारात लावला होता हा ट्रॅक्टर प्रवीण पोपट शिंदे यांनी दिनांक 8ऑक्टोबर 2018 ते 8 फेब्रुवारी 2019 या कालावधीत पोलीस ठाण्याच्या आवारातून चोरून नेला होता. याबाबत जत पोलीसात गुन्हा दाखल झाला होता. जत ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाङ याचे मार्गदशर्नाखाली पोलीस उपनिरीक्षक आर. एस. गुंङरे, हवालदार उमर फकीर, प्रशांत गुरव, केरबा चव्हाण, संतोष चव्हाण, सागर पाटील यांनी तपास करून तर चोरीला गेलेला ट्रॅक्टर व संशयित प्रवीण पोपट शिंदे याने गुन्ह्यातील चोरीला ट्रॅक्टर हा वाळेखिंडी गावच्या हद्दीत लपवून ठेवला होता, त्या ट्रॅक्टरसह आज त्याला ताब्यात घेतले. अधिक तपास उपनिरीक्षक आर. एस. गुंङरे करीत आहेत.

No comments:

Post a Comment