जत,(प्रतिनीधी)-
जत तालुक्यातील
पाच्छापुर येथील शेतकरी राम चव्हाण याच्या गावाजवळ असलेल्या शेतात सकाळी साडेनऊ वाजता
चार जर्सी गाई बांधले होते त्यावेळेस जेवण करण्यासाठी सर्वजण घरात गेल्यानंतर दोन लांडगे
हल्ला करून एक जर्सी गाय जागेवरच ठार केली. गाईचा हंबरडा आल्यानंतर
घरातील सर्वजण बाहेर आल्यानंतर लांडग्याने पळ काढला. या घटनेत
पन्नास हजाराचे नुकसान झाले.
याबाबत अधिक माहिती अशी की पाच्छापुर
येथील गावापासून जवळच राम चव्हाण यांची शेती आहे. ती चार दुबती
जर्सीगायी आहेत साडेनऊ वाजता शेतातील घराजवळच पाठीमागे च्या बाजूला चार्यासाठी चारी गाई बांधल्या होत्या त्यानंतर त्यांनी जेवण करण्यासाठी सर्वजण
घरी गेल्यानंतर अचानक दोन लांडगे येऊन एका गाई वरती हल्ला करून गाईला जागेवरच ठार केले.
गाईनी हंबरङा फोङल्या नंतर घरातील सर्वजण जाऊन लांडग्यांना हुसकावण्याचा
प्रयत्न केल्यानंतर लांडगे पळून गेले. मात्र गाईचा जागीच मृत्यू
झाला असून दुष्काळात या शेतकर्याचे 50000 नुकसान झाले आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच वन
विभागाच्या अधिकारी यांनी भेट देऊन पशुवैद्यकीय अधिकार्यांकडून
पंचनामा करून शासकीय मदत मिळवून देण्यासाठी शासनाकडे फाईल पाठवून दिली असून.
पाच्छापुर परिसरात मात्र लांङग्यांचे मोठ्या प्रमाणात कळप आल्याने लांडग्यांना
खाण्यासाठी काही नाही शेळ्या मेंढ्या वजनावर ते हल्ला करण्याचे प्रमाण वाढले असून वन
विभागाने त्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी येथील अनेक शेतकर्यांनी सांगितले
No comments:
Post a Comment