Friday, March 8, 2019

बिळूरच्या काळभैरव देवस्थानला तीर्थक्षेत्राचा ब दर्जा


जत,(प्रतिनिधी)-
 बिळूर (ता. जत) येथील श्री काळभैरवनाथ देवस्थानला ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गतवर्ग दर्जा देण्यात आल्याची माहिती देवस्थान कमिटीचे चेअरमन सोमनिंग जीवनावर यांनी दिली. ते म्हणाले की, कर्नाटक व महाराष्ट्राचे आराध्यदैवत म्हणून ओळखल्या जाणार्या बिळूर (ता. जत) येथील श्री काळभैरवनाथ देवस्थान कमिटी ने ग्रामीण तीर्थक्षेत्र विभागाकडे व दर्जा मिळण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता.
राज्य समितीने काळभैरवनाथ देवस्थानच्या कमिटीने व दर्जासाठी आवश्यक असणारे निकष पूर्ण केल्याने काळभैरवनाथ देवस्थान ला ग्रामीण विकास योजनेंतर्गत व दर्जा प्रदान केला आहे. त्यामुळे देवस्थानच्या विकासाच्या कामासाठी कोणतीच अडचण नाही. सध्या देवस्थान कमिटीने लोकवर्गणीतून मंदिराचा कायापालट केला आहे. भक्तांच्या सोयीसाठी सुसज्ज भक्त-निवास बांधण्यात आले आहेत ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांच्या सहकार्याने मंदिराच्या विकासाला गती घेतली आहे या देवाची वर्षातून फेब्रुवारीत मोठी यात्रा भरते. जगात कोणत्याही यात्रेत पाहावयास मिळणार नाही, अशी हरबंडी फरार या यात्रेत पाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात. श्री काळभैरवनाथ देवस्थानला वर्ग दर्जा मिळण्यासाठी खासदार संजय पाटील व आमदार विलासराव जगताप यांनी विशेष प्रयत्न केले. श्री काळभैरवनाथ सोमनिंग बिळूर काळभैरवनाथ देवस्थानासवर्गाचा दर्जा मंदिर हे ब वर्ग दर्जा प्राप्त करणारे जत तालुक्यातील काळभैरवनाथ हे एकमेव तीर्थक्षेत्र आहे यामुळे मिळणार्या अनुदानातून भक्तनिवास शौचालयांतर्गत रस्ते संरक्षण भिंत पाणीपुरवठ्याची सोय करणार्या नसल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment