जत,(प्रतिनिधी)-
तालुक्यात उष्णतेची तीव्रता वाढू लागल्याने
तहान भागविण्यासाठी बाजारपेठेत मातीपासून तयार केलेल्या डेर्यांची मागणी वाढली असून याच्या किमतीनीही गतवर्षी पेक्षा
भाव खाल्ला आहे.
मागील काही दिवसापासून उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली असून बाजारपेठेत गरिबांचा फ्रीज म्हणून ओळख असलेले डेरे विक्रीस येत आहेत. जत तालुक्यात मडकी तयार करून विकणारे कुंभार कुटुंब कमी आहेत. या कुटुंबाणी आपल्या कुटुंबाची मदत घेत मोठ्या प्रमाणात डेरे तयार केले आहेत. सध्या डेरे तयार करण्यासाठी माती जतमध्ये उपलब्ध नसल्याने ती पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथून आणून डेरे तयार करत आहेत. वाहतुकीचा खर्च वाढल्याने याचा परिणाम डेर्यांच्या किमतीवर होत आहे. तीन ब्रास मातीमध्ये 2 हजार डेरे तयार होतात. सध्या बाजारातील एका डेर्याची किंमत दीडशे ते अडीचशे रूपयापर्यंत आहे. यामधून नैसर्गिकरीत्या थंड पाणी मिळत असल्यामुळे ग्राहकांचा खरेदी करण्याकडे ओढा जास्त आहे. फ्रीजमधील थंड पाणी पिल्यानंतर याचा शरीरावर विपरीत परिणाम होत असल्याने ग्रामीण भागात डेर्याला दुसरा पर्याय नाही.

No comments:
Post a Comment