Wednesday, March 13, 2019

आचारसंहिता काळात तरी अवैध व्यवसाय रोखा


जत,(प्रतिनिधी)-
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारपासून आचारसंहिता लागू झाली आहे. या काळात पोलीस प्रशासनाचे सर्वच राजकीय हालचालींकडे बारीक लक्ष असले तरी अवैध व्यवसायाकडे मात्र त्यांनी दुर्लक्ष करू नये, अशी अपेक्षा आहे. अवैध व्यवसायाच्या निमित्ताने काही वाद होण्याची भीती असते आणि याचा परिणाम निवडणुकीवर होण्याचीही शक्यता असते. हे सर्व होऊ नये यासाठी या काळात तरी पोलिसांनी अवैध व्यवसायांवर नियंत्रण ठेवावे, अशी जतकरांची अपेक्षा आहे.
जत शहर पोलीस ठाण्यांतर्गत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचार्यांना आपल्या कार्यकर्तृत्वाचा   फारसा प्रभाव पाडता आलेला नाही. याउलट अवैध व्यवसायांनी जतेत तोंड वर काढल्याने रोज काम करून खाणार्यांचे संसार उघड्यावर येण्याची भीती आणखी अधिक पटीने निर्माण झाली आहे. जत पोलीस ठाण्यात काम करणार्या कर्मचार्यांची अरेरावी व त्यांच्याकडून चोरी छुपे अवैध व्यवसाय करणार्यांना मिळणारे अभय हे सामान्य जनतेच्या लक्षात यावे इतके स्पष्ट आहे. यानंतरही वरिष्ठ अधिकारी यावर कोणतीच भूमिका घेताना दिसत नाहीत. उगाच शिस्तीचा फार्स करणार्या पोलिसांनी अवैध व्यवसाय अन् वाढलेल्या चोर्यांचे प्रमाण आधी नियंत्रणात आणावेत, असेही जतमधील प्रत्येकाचे म्हणणे आहे.

No comments:

Post a Comment