Sunday, March 3, 2019

संगीत हे संस्काराचे उत्तम साधन

भारतात फार पूर्वीपासूनच संगीत प्रचलित असून यात भारतीय शास्त्रीय संगीताच्या हिंदुस्थानी संगीत आणि कर्नाटकी संगीत अशा दोन प्रमुख पदधती आहेत. याखेरीज भजन कव्वाली लावणी पोवाडा यांसारखे अनेक लोकसंगीताचे प्रकार भारतात प्रसिध्द आहेत. हाच परंपरेचा वसा घेतलेला तसेच आधुनिक काळाला संस्काराची शिदोरी देणारे संगीत व्यक्तिमत्व विकासाचे उत्तम साधन आहेत. याच भारतातील विविध कला जसे की नृत्य हस्तकला चित्रकला शिल्पकला अशा अनेक कला अशा अनेक कला विकसित होत आहेत. या विविध कला प्रकारात आपले वेगळे अस्तिव सिध्द करणारे तसेच संस्कार देणारे संगीत प्रभावी ठरत आहे. आज शाळा महाविद्यालयांमधून कला विषय मोठया उत्साहात शिकवला जातो याच कला विषयांतर्गत संगीत ही कला बालमनावर प्रभाव करत आहे. आजची बालपीढी टी व्ही संस्कृतीकडे आकर्षिली जात असतानाच शाळेतून शिकवल्या जाणार्‍या या संगीतामुळे अध्यात्म तसेच जेष्ठांबददल आदर स्नेह भावना तसेच सामाजिक जाणीव आदी गुणांचा या संगीतामुळे बालकांवर उपयोजनात्मक प्रभाव पडत आहे. प्रार्थना प्रतिज्ञा राष्ट्रगीत राष्ट्रीय गीते समूहगीत अभंगगायन स्वागत गीते महापुरूषांच्या कार्यकतृत्वाचे वर्णन विषद करणारे पोवाडे आदींच्या गायनाने देशाभिमान तसेच महापुरूषांना वंदन, स्मरण करण्याची प्रेरणा या गायनातून मिळू लागली आहे. सामूहिक गायनातून स्वर आवाजातील चढउतार तसेच हावभाव सभाधीटपणा आदी गुणांचा विकास देखिल या संगीताद्वारे होत आहे. याशिवाय चित्रपटातून दृश्य स्वरूपांतील गाण्यांच्या चित्रफितीतून दिसणार्‍या पाश्‍चात्य संस्कृतीचा पगडा आजच्या बालमनावर होताना दिसत आहे यावर भारतीय संगीताच्या प्रकारांची माहिती व ओळख करून देण्याची गरज आता निर्माण झाली आहे. अन्यथा या धावपळीच्या युगात भारतीय संगीताचा अनमोल ठेवा नामशेष होऊ शकतो. आज अनेक गृहीणींना देखिल हेच संगीत एक छंद म्हणून तर व्यावसायिक उददेशाने देखिल एक व्यासपीठ बनू शकते यासाठी या संगीतामुळे कोणतेही दुष्परिणाम होण्याएैवजी होणारे फायदे हे दूरगामी स्वरूपाचे आहेत.पुस्तकाच्या वाचनाने जसा एकटेपणा दूर होऊन पुस्तक त्या व्यक्तीला पुस्तकातील आशयाने हसवू शकते रडवू शकते भावनाप्रधान करू शकते त्याच प्रमाणे संगीत देखिल एकटेपणा दूर करून आल्हाददायक वातावरणाची निर्मिती करू शकते.

No comments:

Post a Comment