जत,(प्रतिनिधी)-
संत निरंकारी मंडळ शाखा जत व महादेव पाटील यांच्या सहाय्यातून वळसंग येथे पाणपोईचे उदघाटन संत निरंकारी मंडळाचे सेवादल संचालक संभाजी साळे यांचे हस्ते सुरु करण्यात आले. यावेळी मंडळाचे सुभाष माने,जगन्नाथ केंगार, महादेव पाटील आदी तसेच संत मंडळी तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी महादेव पाटील यांनी सांगितले की जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे.सर्वाच्या घटामंध्ये एकाच ईश्वराचे वास्तव्य असते ,देव हा एक आहे व तो निर्गुण निराकार आहे. मनुष्याची सेवा केलेनंतर ईश्वर खुश होतो.ईश्वराला ती सेवा प्रिय आहे सर्व लेकरे एका प्रभु परमात्म्याची आहेत याची शिकवण निरंकारी सद्गुरु माता सुदिक्षाजी महाराज यांचे कडुन प्राप्त झालेनंतर प्रेरित होऊन पाणपोईची छोटीशी सेवा करण्याचा प्रयत्न करत आहे, असे सांगितले.
या उपक्रमाचे कौतुक गावातील नागरिकांनी केले. रस्त्यावरुन जाण्या येणाऱ्या वाटसरुना या पाणपोईमुळे नक्कीच लाभ होईल.नर सेवा हिच नारायण सेवा यासारखी दुसरी कोणती सेवा नाही संत निरंकारी मंडळ याचीच शिकवण आज देत आहे, असे संभाजी साळे यांनी सांगितले,उद्घाटन प्रसंगी उपस्थित नागरीकानी उपक्रमाची प्रेरणा घेऊन शेजारील गावांमध्ये ही पाणपोई सुरू करणार आहे असे सांगितले.
No comments:
Post a Comment