Thursday, March 7, 2019

प्रत्येक ‘स्त्री’ने पर्यावरणाचा जागर करावा


सुखकर जीवन जगण्यासाठी पाणी, हवा देणारी पृथ्वी ही आपली माय म्हणून मानली जाते, तशी प्रत्येक घरातील स्त्री ही केंद्रस्थानी असते, तिला ही माय म्हणूनच मानले जाते. जागतिक महिला दिनानिमित्ताने स्त्रियांनी पर्यावरणाचा जागर करण्याची वेळ आली आहे. चार भिंतीचं घर... सभोवती अंगण... त्याला स्वच्छतेच्या संस्काराचं कोंदण...
आज स्वच्छतेवर मोठ्या प्रमाणात जागृती होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या परीने स्वच्छता मोहीम राबवत असते, यात लोकसहभाग वाढवण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जातात, यात आपल्या घराची स्वच्छता ठेवणे हे प्रत्येक स्त्रीचे कामच असते, मग स्त्री नोकरदार असो की घरकाम करणारी स्त्री असो... आपण पृथ्वीला माय मानतो, तसेच प्रत्येक स्त्री कुणाची ना कुणाची माय असते. पृथ्वी आपल्याला हवा, पाणी सजीवता देते. आपल घर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी जशी स्त्रीची असते, तशीच अशी ही पृथ्वी स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे. आज जागतिक महिला दिन आहे. महिला सर्व क्षेत्रात अग्रभागी असते. या निमित्ताने स्वच्छता मोहिमेत स्त्रीचा सहभाग मोलाचा असतो. स्त्री घराला वळण लावू शकते. संस्कार देऊ शकते, त्यामुळे प्रत्येक स्त्रीने आपल्या घरातील कचरा आणि विघटन केले तरी 70 टक्के कचर्याचा प्रश्न निकाली निघेल. स्वच्छता म्हणजे काय? आपल्या घरात निर्माण होणारा कचरा नैसर्गिकरित्या आणि शास्त्रीय पध्दतीने विघटन करणे आवश्यक आहे. घ र ा त ल ा ओला कचरा बाहेर टाकण्याऐवजी घरातच कंपोष्ट करून फुलांच्या कुंड्यासाठी वापरता येतो. महिलांनी प्लास्टिक न वापरणे, सुक्या कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेस सहकार्य करणे आवश्यक आहे. महिला आपल्या कुटुंबाची जेवढी काळजी घेते तेवढीच स्वच्छतेची घेते. कुटुंबाचे आरोग्य जपण्यासाठी स्त्री सातत्याने प्रयत्न करते, कौटुंबिक स्वास्थ्यासाठी ती प्रयत्नशील असते. स्त्रीला ते सहजशक्य आहे. शहराचे आरोग्य यामुळे चांगले राहते. घरातल्या प्रत्येक स्त्रीने स्वच्छतेकडे सजगतेने पाहिले तर जागेवरच कचर्याचा प्रश्न सुटू शकतो. प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी शासनाने सुरु केली आहे. एखादी प्लास्टिक पिशवी जमिनीत गाडली तर 400 वर्षांनंतरही तशीच असते, असं संशोधन सांगतं, यामुळं होणारं वायू, हवा प्रदूषण वेगळंच असतं. ज्या पृथ्वीने निसर्ग, पाणी, हवा दिली, त्याचं संवर्धन करणं ही आपली जबाबदारी आहे. यात महिलांचा सहभाग मोलाचा आहे. या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने स्त्रियांनी सजग राहून पर्यावरण संवर्धनासाठी जागरूक राहिले पाहिजे. यासाठी प्लास्टिक न वापरणे, रिक्षाघंटागाड्या सुरु केल्या आहेत. नागरिकांनी विशेषतः महिलांनी घरातला ओला कचरा घरातच मोकळ्या बॅरेलमध्ये कुजवून एखादे रोपटे लावा, कचरा हे सोने असते. संध्याकाळी आपल्या घरी दिवा लावून आरोग्यम धनसंपदा अशी प्रार्थना केली जाते. स्त्रीने स्त्रीशक्ती म्हणून उभं राहणं गरजेचे आहे. स्त्रीने पर्यावरणाचा जागर करावा, पर्यावरणपूरक वागणं अ स ा व ं , स्वयंपाकघरात वाया जाणारं पाणी घराच्या परिसरातील वाढलेल्या झाडांना देता येते. भाजीपाला, तांदूळ धुऊन वाया जाणारे पाणी हे झाडांना द्या, यातून नवीन पिढी घडत असते.

No comments:

Post a Comment