जत,(प्रतिनिधी)-
ग्रामीण भागातदेखील
‘जार’च्या पाण्याला मागणी वाढली आहे.त्यातच आता ‘जार’मधून थंड
पाणी घरोघरी पोहोच होऊ लागल्याने माठांची मागणी कमी होऊ लागली आहे. गरिबांचा फ्रिज आता लोकांना नकोसा झाला आहे.
किडनी स्टोन आणि
अशुद्ध पाण्यामुळे होणारे आजार याची धास्ती घेऊन शहरांबरोबरच ग्रामीण भागातही
लोकही शुद्ध पाण्याची मागणी करताना दिसत आहेत. बिळूरसह डफळापूर,मुचंडी,उमराणी, माडग्याळ
या दहा ते 15 हजार लोकवस्ती असलेल्या गावांमध्ये
बाटलीबंद पाण्याला मागणी वाढू लागली आहे. पूर्वी 40 ते 50 रुपयांना येणारा 20 लिटरचा जार आता फक्त 10 रुपयात उपलब्ध होत
आहे. त्यामुळे ग्रामस्थ फक्त पिण्यासाठी म्हणून या
पाण्याचा वापर करताना दिसत आहेत.
आता उन्हाळा सुरू
झाल्याने पाणी पुरवणार्या व्यावसायिकांनी थंड पाणी पुरवायाला सुरुवात केली आहे. अवघ्या 15 ते 20रुपयांना हा जार मिळू लागल्याने त्याची मागणीही वाढली आहे. साहजिकच गरिबांचा फ्रिज म्हणून नावलौकिक असलेल्या माठांच्या विक्रीवर
मात्र परिणाम झाला आहे. त्याची विक्री तब्बल 30 ते 40 टक्क्यांनी घटली आहे.यामुळे कुंभार व्यावसायिकांचा व्यवसाय धोक्यात आला आहे.
No comments:
Post a Comment