सांगली,(प्रतिनिधी)-
सांगली
जिल्हा परिषदेकडील ज्या शिक्षकांची रँडम राऊंडमध्ये बदली झाली होती अशा शिक्षकांची
सोईच्या ठिकाणी नियुक्ती करण्यासाठी संबधित शिक्षकांकडुन विकल्प घेण्यात आले.
लवकरच समुपदेशाने या शिक्षकांना सोईची शाळा देण्यात येणार असुन अनेक
दिवसांची या शिक्षकांची अडचण दुर होणार आहे. सुमारे
231 शिक्षकांना याचा लाभ होणार आहे.
दरम्यान या
सर्वांना नव्या वर्षातच नियुक्त्या दिल्या जाणार आहेत असे सीईओ अभिजित राऊत यांनी स्पष्ट
केले. दरम्यान विस्थापीत झालेल्या शिक्षकांचीही सोय करण्याचा
प्रयत्न प्रशासन करेल अशी अपेक्षा शिक्षक संघटनांनी व्यक्त केली. शासनाच्या नव्या आदेशानुसार मागील वर्षी प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या झाल्या
होत्या. त्यामधील रँडम राऊंडमध्ये अनेक शिक्षकांवर अन्याय झाल्याची
शिक्षकांची तक्रार होती. याबाबत आयुक्त कार्यालयाकडेही तक्रारी
केल्या होत्या. आयुक्त कार्यालयात तक्रारी दाखल झालेल्या सुमारे
अडीचशे शिक्षकांपैकी हाताच्या बोटावर मोजण्याइतपत तक्रारी ग्राह्य धरत त्या शिक्षकांची
सोईच्या ठिकाणी नियुक्ती करण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यानंतरही
231 शिक्षक बाकी होते. त्या शिक्षकांनी अनेक दिवसांपासुन
सोईच्या ठिकाणी बदली मिळावी यासाठी प्रयत्न सुरू ठेवले होते. 28 जून 2018 रोजी एक शासन आदेश काढला आहे. या आदेशानुसार रँडम राऊंडमधील शिक्षकांना सोईच्या ठिकाणी नियुक्ती द्यावी अशी
मागणी होती. लोकसभा आचारसंहिता कधीही लागू शकते. त्यामुळे या सोईच्या नियुक्त्या आचारसंहितेत अडकू नये यासाठी सीईओ श्री राऊत
यांच्या आदेशाने संबधित 231 शिक्षकांकडुन सोईच्या शाळांचे विकल्प
घेण्यात आले. यानंतर ज्या तालुक्यात जाण्यास इच्छुक आहेत अशा
तालुक्यातील शिक्षकांना एकत्रीत बोलावुन समुपदेशाने सोईच्या शाळा देण्यात येणार आहेत.
एका दिवसात दोन तालुक्यांचे शिक्षक बोलावण्यात येणार आहेत. शिक्षक संघटनेच्या पदाधिकार्यांशी बोलताना विस्थापीत
शिक्षकांच्याबाबतीही सकारात्मक चर्चा करण्यात आली. त्यांच्याबाबतही
योग्य निर्णय घेऊ मात्र शिक्षकांनी समजावून घेतले पाहीजे अशी अपेक्षा अधिकार्यांनी व्यक्त केली.
No comments:
Post a Comment