Saturday, March 2, 2019

परवान्याविना होणार्‍या शीतपेय, खाद्य विक्रीवर कारवाई करण्याची मागणी


जत,(प्रतिनिधी)-
उन्हापासून वाचण्यासाठी नागरिकांकडून पसंती दिल्या जाणा-या सर्व प्रकारच्या शीतपेयांची विक्री अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (एफडीए)परवाना नोंदणी शिवाय करता येत नाही. परंतुजतसह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी परवानाविना शीतपेयांची विक्री केली जात आहे. बनावट शीतपेयेअस्वच्छ बर्फअस्वच्छता अशा अनेक कारणांमुळे आजारांना आमंत्रण मिळत आहे. त्यामुळे एफडीएकडून संबंधित शीतपेय विक्रेत्यांवर व रसवंतीगृह चालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात यावाअशी मागणी होत आहे.

एप्रिल महिन्याचा दुसर्‍या आठवड्याला सुरुवात होत आहे. नागरिकांना उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवू लागला आहे. त्यामुळे नागरिकांची पाऊले आपोआपच शीतपेयांच्या दुकानांकडे व रसवंतीगृहांकडे वळू लागली आहेत. उष्ण वातावरणात शरीराला थंडावा देण्यासाठी ज्युस,आईस्क्रीम,लिंबू सरबत,नीरा यांसह ऊसाच्या रसाला मोठ्या प्रमाणावर पसंती दिली जात आहे. परंतुप्रत्येक रसवंतीगृह व शीतपेय विक्रेत्याने नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून स्वच्छतेबाबत काळजी घेणे गरजेचे आहे.ऊसाचा रस आणि शीतपेयांमध्ये वापरला जाणारा बर्फ शुध्द पाण्यापासून व खाण्यासाठीच तयार करण्यात आला आहे काहे तपासणे गरजेचे आहे. यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडून संबंधित दुकानांची तपासणी होण्याची गरज आहे. मात्र अशा प्रकारची तपासणी झाल्याचे कधीच ऐकिवात नाही. त्यामुळे लोकांच्या आरोग्याशी खेळला जाणारा खेळ थांबणार कसाअसा सवाल उपस्थित होत आहे.
 महाराष्ट् अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 नियम व नियमने 2011 अंमलात आलेला असल्याने या कायद्यान्वे अन्न व्यावसायिकांना परवाना घेणे बंधनकारक आहे. विना परवाना अन्न व्यावसाय केल्यास संबंधितांवर फौजदारी खटला दाखल केला जातो. तसेच त्यांना 6 महिने कारावास व 5 लाखापर्यंत दंड होऊ शकतो. त्यामुळे अशा व्यावसायिकांनी परवाना घेणे आवश्यक आहे. या कायद्यानुसार फळ विक्रेता,भाजी विक्रेताउपहारगृहेमिठाई उत्पादक विक्रेतेवाईनबिअर शॉपपाणीपुरी ,भेळविक्रेताहॉटेल्सबेकरी उत्पादकआदींनी एफडीएचा परवाना घेणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे रसवंतीगृह व शीतपेय विक्रेत्यांनी सुध्दा परवाना नोंदणी करणे बंधनकारक आहे. मात्र,उन्हाळा सुरू झाल्यानंतर अनेकांकडून विना परवाना शीतपेयांची विक्री केली जात असल्याचे दिसून येत आहे. 
शीतपेये किंवा पाण्याच्या बाटल्या फ्रीजमध्ये न ठेवता बर्फाच्या पाण्यात ठेवल्या जातात. ते पाणी अस्वच्छ असते.ग्रामीण भागात परिचित नसलेल्या कंपनीची परवाना नसलेली शीतपेये ठेवलेली आढळतात. दुकानात स्वच्छतेचा अभाव असतो. शीतपेयांवर जादा आकारणी केली जाते. असे किती तरी प्रश्‍न आहेतज्यामुळे ग्राहकांच्या आरोग्याशी खेळले जाते. अन्न व औषध प्रशासनाने खास मोहीम काढून ग्रामीण भागातल्या शीतपेय दुकानांची तपासणी करण्याची मागणी होत आहे. 

No comments:

Post a Comment