Monday, March 4, 2019

दोन वेगवेगळ्या अपघातात दोन ठार


कवठेमहांकाळ,(प्रतिनिधी)-
 तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात एक मिरजेतील दुचाकीस्वार; तर थबडेवाडी येथील एकजण असे दोघे जागीच ठार झाले. मिरजेतील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. मिरज-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर शिरढोण (ता. कवठेमहांकाळ) येथे दुचाकी व ट्रकची जोराची धडक बसून झालेल्या अपघातात तौसीफ इब्राहीम बानदार वय (वय 32, रा. लक्ष्मी मार्केट, मोमीन गल्ली मिरज) असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.
दरम्यान, दुसर्या घटनेमध्ये कवठेमहांकाळ शहरातीलमहावितरणच्या कार्यालयासमोर दुचाकी विजेच्या खांबाला धडक बसून थबडेवाडी येथील दादासो मारुती खोत (वय 40) यांचा मृत्यू झाला. दोन्ही अपघात सोमवारी एकच्या सुमारास घडले असून याची नोंद कवठेमहांकाळ पोलिसांत झाली आहे. याबाबत आधिक माहिती अशी की, तौसीफ बानदार व त्यांचा लहान मुलगा हुजेफ बानदार व आमिन सलाती हे दुचाकीवरून ढालगाव (कवठेमहांकाळ) येथील इज्तेमाला निघाले होते. शिरढोणमधून नमाज पठण करून बाहेर रस्त्यावर येत असताना पाठीमागून आलेल्या ट्रकने (एमएच 10 ए क्यू 2736) त्यांच्या दुचाकीला (एमएच 10 बी एस 6950) जोराची धडक दिली. बानदार यांच्या अंगावरून चालकाच्या बाजूचे चाक गेल्याने व डोक्याला जोराचा मार लागल्याने ते जागीच ठार झाले; तर हुजेफ बानदार, आमिन सलाती दोघेही (रा. मिरज) गंभीर जखमी झाले. या जखमींना मिशन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुसर्या घटनेत कवठेम हांकाळ शहरातीलमहावितरणकार्यालयातील काम आटोपून दादासो खोत थबडेवाडी येथे दुचाकीवरून (एमएच 03 ए जे 6849) जात होते. यावेळी त्यांचा ताबा सुटल्याने जवळच असलेल्या विजेच्या खांबाला दुचाकीची जोराची धडक बसली. यात त्याच्या डोक्यास जोरात मार लागल्याने रक्तस्त्राव होऊन जागीच मृत्यू झाला. या दोन्ही अपघातांची नोंद कवठेमहांकाळ पोलिसांत झाली आहे.

No comments:

Post a Comment