सांगली,(प्रतिनिधी)-
शासनाकडे
वारंवार पाठपुरावा करूनही गोंधळी, जोशी, वासुदेव आणि बागडी समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. दादा इदाते आयोगाने दिलेल्या शिफारसी मान्य कराव्यात, या समाजाची शासनदरबारी जातनिहाय जनगणना करावी, नॉनक्रिमिलियर
दाखल्याची जाचक अट रद्द करावी, यासह इतर मागण्यांसाठी गुरुवारी
जिल्हा गोंधळी, जोशी, वासुदेव व बागडी समाजाच्यावतीने
जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
पारंपरिक वेशभूषा
व वाद्यांचा गजर आणि घोषणांमुळे मोर्चा लक्षवेधी ठरला. समाजाच्या
प्रलंबित मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी आयोजित या मोर्चात सांगली, मिरज, जतसह इचलकरंजी, जयसिंगपूर
परिसरातीलही समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. विश्रामबाग
येथील क्रांतिसिंह नाना पाटील चौकापासून मोर्चास प्रारंभ झाला. यावेळी जिल्हाधिकार्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात
म्हटले आहे की, गोंधळी, जोशी, वासुदेव व बागडी समाजातील मागण्यांसंदर्भात हा मोर्चा असून, समाजाच्या मागण्या प्रलंबित आहेत. त्यानुसार दादा इदाते
आयोगाने केलेल्या शिफारसी ताबडतोब मान्य करून त्याचा अहवाल मंत्रिमंडळासमोर मंजूर करावा,
वरील सर्व समाजाची शासनदरबारी जातनिहाय जनगणना करावी, आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी जिल्हा समन्वयक रविकांत
अटक, परशुराम मोरे, तुकारामबाबा महाराज,
चंद्रकांत मोरे, शशिकांत वाघमोडे, महेश भोसले, नगरसेवक शिवाजी दुर्वे, दिगंबर जाधव, राजू भोसले, चंद्रकांत
जाधव, राहुल मोरे, शैलजा दुर्वे,
अमित सर्वदे, परशुराम दोरकर, अजित दोरकर आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment