जत,(प्रतिनिधी)-
येळवी
(ता. जत) ग्रामपंचायतीच्या
वतीने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यम ातून दिव्यांगांसाठी तीन चाकी सायकल,
काठी व श्रवणयंत्र वाटप करण्यात आले. येळवीचे सरपंच
विजयकुमार पोरे म्हणाले, समाजातील दृष्टिहीन, कर्णबधिर, अस्थिव्यंग, मनोविकलांग
व कुष्ठरोगमुक्त अपंग व्यक्तींकडे, त्यांच्या अपंगत्वाकडे न पाहता
त्यांच्यामध्ये असलेल्या सामर्थ्याकडे पाहावे.
5 वर्षांवरील
40 टक्के अपंगत्व असलेल्या सर्वांना दरमहा दोन हजार रुपये पंडित दीनदयाळ
उपाध्याय ‘पेन्शन’ योजना यासारख्या विविध
योजना देखील आहेत. त्याअंतर्गत अपंग व्यक्तींसाठी विविध योजना
उपलब्ध आहेत. यासाठी सर्वतोपरी आपण प्रयत्न करू व लाभार्थ्यांना
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या योजनांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करू.
यावेळी ज्येष्ठ नेते पंचाक्षरी अंकलगी, ग्रामसेविका
कविता सोनवणे, उपसरपंच सुनील अंकलगी, शंकर
आवटे, संतोष पाटील, सुरेश आवटे,
बाळासो शिंदे, सदाशिव पुकळे, पोपट रुपनूर, बाळासो दुधाळ, आनंदा
क्षीरसागर, अनिल सोंगटे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment