सुविधा आणि संपत्तीचा अति हव्यास, त्याबरोबरच
अफाट लोकसंख्येमुळे वाढत्या गरजा यांच्यापोटी पृथ्वीवरील नैसर्गिक साधनसामग्रीचा
वापर आता धोकादायक स्थितीत पोहोचलेला आहे. त्यामुळे होणार्या पर्यावरण र्हासाचे
दुष्परिणाम केवळ सजीवांच्या काही विशिष्ट जातींपुरते मर्यादित राहणार नाहीत तर
भावी मानवी पिढ्याचे जीवनही धोक्यात येईल. ही सध्याची स्थिती आहे.
सार्या जगाची
ती चिंता झालेली आहे. म्हणनूच, वेळीच सावध होऊन विविध
स्तरांवर, अनेक दिशांनी पर्यावरण रक्षणाच्या प्रयत्नांचे यश,
म्हणजेच भविष्यातील मानवी पिढ्यांच्या जीवनाचे भवितव्यही पूर्णत:
आजच्या युवक आणि विद्यार्थ्यांच्या हाती असणार आहे. चला, आत्तापासून
आपण पर्यावरण रक्षणासाठी सज्ज होऊया! पर्यावरण वाचविण्याची प्रतिज्ञा करूया!
पर्यावरण प्रतिज्ञा पर्यावरण हे सर्वच सजीव आणि निर्जीव घटकांचे विश्व आहे. सारे
सजीव माझे सगे-सोयरे आहेत. पर्यावरणातील निसर्गावर माझे मनापासून प्रेम आहे.
विविधता आणि उपयुक्ततेने नटलेल्या निसर्गाचा मला अभिमान आहे. या विश्वातील जैविक
तसेच अजैविक घटकांचा सेवक होण्याची क्षमता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव
प्रयत्न करीन. मी माझ्या परिसराचा, वृक्षराजींचा, सर्व प्राणिमात्रांचा, काळ्या मातीचा मान ठेवीन आणि
त्यांचे जतन करण्याचा मी निश्चय करीत आहे. त्यांचे संरक्षण आणि संवर्धन यातच माझे
सौख्य व सर्व विश्वाची सुरक्षितता सामावली आहे याची मला जाणीव आहे.
No comments:
Post a Comment