जत,(प्रतिनिधी)-
संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळी स्थितीमुळे
भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत
लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कक्षेतून चारा छावण्यांचा विषय वगळून त्वरित चारा छावण्या
सुरू कराव्यात, अशी मागणी जत तालुक्यातून होत आहे.
जत तालुक्यात भयानक असा दुष्काळ पडला आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या चार्यांचाही मोठा प्रश्न पडला आहे. यंदा पेरण्याच झाल्या नसल्याने जनावरांना चाराच उपलब्ध झाला नाही. त्यामुळे जनावरांचे मोठे हाल सुरू असून अनेक शेतकर्यांनी आपल्या जनावरांना बाजाराचा रस्ता दाखवायला सुरू केली आहे. दुष्काळग्रस्त गावासाठी चारा छावणी मंजूर करण्यासंबंधीचा शासन निर्णय झाला आहे, परंतु चारा छावणी सुरू करण्यासाठी लोकसभा निवडणूक आचारसंहितेचे कारण सांगितले जात आहे. सध्या चार्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून चारा छावणी सुरू करण्यास प्रशासनाने मंजुरी द्यावी, अशी मागणी होत आहे.
याशिवाय पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व शेतकर्यांच्या बँक खात्यात सन्मान योजनेतील निधी त्वरित जमा करावा, ग्रामीण भागात त्वरित पाण्याचे टँकर सुरू करावेत, अशीही मागणी होत आहे.
No comments:
Post a Comment