Wednesday, March 27, 2019

वीज बिलाचा भरणा करताना हस्तलिखित पावत्या स्वीकारू नये संगणकीय पावत्याच स्वीकाराव्यात


महावितरणचे आवाहन
जत,(प्रतिनिधी)-
 ग्राहकांनी केलेल्या वीज देयकाचा भरणा बिनचूक, वेळेत व त्यांच्या खात्यावर समायोजित व्हावा यासाठी महावितरणकडून ग्राहकांना संगणकीकृत पावत्या देण्यात येतात. त्यामुळे फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी संगणकीय पावत्याच स्वीकाराव्यात. हस्तलिखित पावत्या स्वीकारू नयेत. तसेच असे प्रकार आढळून आल्यास ग्राहकांनी त्वरित नजीकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहनमहावितरणने केले आहे.

ग्राहकांना विविध सेवासूविधा, सोप्या व सुरक्षित पध्दतीने मिळाव्यात म्हणूनमहावितरणकडून सातत्याने विविध उपाययोजना करण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणूनमहावितरणने आपली सर्व वीज बिल भरणा केंद्रे (पोस्ट ऑफीस सोडून) केंद्रीकृत संगणकीय प्रणालीवर आणली आहेत. त्यामुळे ग्राहकांनी केलेल्या वीज देयकाचा भरणा अचूक व त्वरित त्यांच्या खात्यावर समायोजित होतो. तसेच यामध्ये ग्राहकांना संगणकीकृत पावत्या देण्यात येतात. परंतू काही ठिकाणी देयकांच्या भरणाची पावती हस्तलिखित स्वरुपात देवून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे वीज ग्राहकांनी महावितरणच्या कोणत्याही प्रकारच्या रकमेचा भरणा करताना संगणकीकृत क्रमांक असलेली संगणकीय पावतीचाच आग्रह धरावा. हस्तलिखित पावती स्वीकारु नये. ’महावितरणने ग्राहकांच्या सोयीसाठी सर्व प्रकारच्या ऑनलाईन भरणा करण्यासाठी विविध पर्याय महावितरणचे संकेतस्थळ  किंवामहावितरणच्या मोबाईल अॅपवर उपलब्ध करुन दिले आहेत. तसेच अशा ऑनलाईन भरणा करणार्या ग्राहकांना बिलाच्या रकमेच्या 0.25 टक्के सूटमहावितरणकडून उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ही सुट ऑनलाईन भरणा केल्यावर पुढील बिलात समायोजित करण्यात येते. त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांनी ऑनलाईन सुविधांचा वापर करावा.

No comments:

Post a Comment