Thursday, March 7, 2019

विस्तार अधिकारी बाळासो कांबळे ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात


जयसिंगपूर,(प्रतिनिधी)-
 पन्हाळा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी बाळासाहेब मारुती कांबळे (वय 53, रा. संभाजीपूर, ता. शिरोळ) यास जयसिंगपूर बसस्थानक आवारात गुरुवारी सायंकाळी 5 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने ही कारवाई केली. बसस्थानकावरच विस्तारअधिकारी लाच घेताना सापडल्याने खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी कांबळे याच्या- विरोधात  गुन्हा दाखल क  र ण् य ा त आला आहे. सातवे (ता. पन्हाळा) येथील उपसरपंच माणिक पाटील यांनी 14 वा वित्त आयोगामधून कामे मंजूर करून दुसर्याच्या नावावर कंत्राट घेऊन ते स्वत: करीत असल्याबाबत त्यांच्याविरोधात गटविकास अधिकारी पन्हाळा यांच्याकडे तक्रार आली आहे. या तक्रारीची चौकशी करण्याचे आदेश पन्हाळा पंचायत विस्तार अधिकारी बी. एम. कांबळे याला देण्यात आले होते. तक्रारदार हे 2 मार्च रोजी सांगलीला जात असताना कांबळे यांनी त्यांची भेट घेतली. आपल्याला सातवे गावचे उपसरपंच पाटील यांच्याविरोधात केलेल्या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी 6 मार्च रोजी आपण येणार असल्याचे सांगितले होते. त्या कामाच्या प्रक्रियेमध्ये त्रुटी आढळून आल्यास तुमच्याविरुद्धही कारवाईचा अहवाल मला पाठवून द्यावा लागेल. तसे करावयाचे नसेल तर तुम्ही दोघांनी मिळून मला 10 हजार रूपये दिले पाहिजे, असे बजावले होते. त्यावेळी ग्रामविकास अधिकारी यांनी त्यांना कामामध्ये कोणत्या त्रुटी झालेल्या नाहीत, असे सांगितले होते. मात्र, त्यांचे बाळासाहेब कांबळे 5 हजारांची लाच घेताना जयसिंगपूर बसस्थानकात झाली कारवाई म्हणणे ऐकून न घेता 10 हजार रुपये न दिल्यास तुमच्याविरोधात अहवाल पाठवेन, असे सांगून 10 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. दरम्यान, उपसरपंच पाटील यांच्याकडून कांबळेने 5 हजार रूपये घेतले होते. त्यानंतर राहिलेले 5 हजार रूपये देण्यासाठी गुरुवारी जयसिंगपूर बसस्थानक आवारातील मुख्य प्रवेशद्वाराजवळ घेताना कांबळे लाचलुचपत विभागाच्या अधिकार्यांनी त्यांना 5 हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडले.

No comments:

Post a Comment