Sunday, March 31, 2019

बहुचर्चित धुमस 5 एप्रिलला प्रदर्शित होणार


जत,(प्रतिनिधी)-
महाराष्ट्रातील लोकप्रिय नेते उत्तम जानकर आणि गोपीचंद पडळकर हे धुमस चित्रपटाच्या निमित्ताने अभिनयात पदार्पण करत आहेत. हा चित्रपट शुक्रवार दि. 5 एप्रिल रोजी महाराष्ट्रातील सिनेरसिकांची मने जिंकण्यासाठी राज्यातील चित्रपटगृहांमध्ये हजेरी लावत आहे. दाक्षिणात्य तंत्रज्ञानाची जोड देऊन हा चित्रपट बनवण्यात आला आहे.

चित्रपटात असलेली गोपीचंद पडळकर-साक्षी चौधरी आणि रोहन पाटील-कृतिका गायकवाड या दोन जोड्यांची रोमँटिक केमिस्ट्री प्रेक्षकांच्या मनाला भूरळ घालते. तर वास्तव जीवनात राजकीय पटलावर नेते असलेले उत्तम जानकर आणि गोपीचंद पडळकर या चित्रपटात अभिनेत्याच्या रुपानेसुद्धा सर्वसामान्य जनतेवर होणार्या अन्यायाविरुद्ध संघर्ष करताना दिसणार आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन शिवाजी दौलतोडे यांनी केले आहे. या चित्रपटात विशाल निकम, भारत गणेशपुरे, कमलाकर सातपुते, अनिल नगरकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. चित्रपटासाठी गीत लेखन अविनाश काले यांनी केले असून पी. शंकरम यांचे संगीत लाभले आहे. या गीतांना सोनू निगम, श्रेया घोषाल, अवधुत गुप्ते, वैशाली सामंत, आदर्श शिंदे, दिव्य कुमार, वैशाली माडे आणि कविता राम यांचा स्वरसाज लाभला आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण पुणे, हडपसर, अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर, राळेगणसिद्धी आणि सोलापूर जिल्ह्यात झाले आहे.



No comments:

Post a Comment