जत,(प्रतिनीधी)-
जत तालुक्यात
भाजप-शिवसेना महायुतीच्यावतीने लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने
कार्यकर्त्यांचा संयुक्त संवाद मेळावा तालुक्यातील दोन गटांनी वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित
केला होता. आमदार गटाने जिजामाता महिला सभागृहात बैठक आयोजित
केली होती; तर दुसर्या गटाने म्हणजेच डॉ.
रवींद्र आरळी, तम्मनगौङा रवी-पाटील यांच्या नेतृत्वाखाली उमा नर्सिंग कॉलेज येथे स्वतंत्र बैठक आयोजित केली
होती. या दोन्ही गटाला खासदार संजय पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी हजेरी लावली. या दोन्ही गटांच्या बैठका संपल्यानंतर सायंकाळी उशिरा दोन्ही गटांचा वाद मिटवण्याचा
प्रयत्न केला. मात्र वाद मिटला नसल्याच समजते.
सांगली
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जत तालुक्यात जोरदार सुरू झाली असून दिवसभर जत तालुक्यात
भाजपचीच चचॉ होती. खासदार संजय पाटील यांच्या प्रचारासाठी कार्यकर्त्यांचा
संवाद मेळावा आयोजित केला होता. भाजप नेते डॉ. रवींद्र आरळी, सभापती तम्मनगौडा रवी-पाटील यांच्या नेतृत्वाखाली उमा नर्सिंग कॉलेज येथे भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांची
बैठक आयोजित केली. या बैठकीस माजी आमदार मधुकर कांबळे,
भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव ताड, युवा नेते
संजय तेली, तालुकाध्यक्ष चंद्रकांत गुडोडगी, सोसायटीचे चेअरमन सोमनिंग बोरामणी, तालुका युवा सेनाअध्यक्ष
बंटी दुधाळ, शिवसेना तालुकाप्रमुख अंकुश हुवाळे, जिल्हा उपप्रमुख तम्माजी कुलाळ, तालुका उपप्रमुख शिवाजीराव
पङोळकर. पंचायत समिती सदस्य रामाण्णा जिवाणावर, सरपंच नागनगौडा पाटील. सलीम गवंडी, अधिकराव भोसले, रेणुका देवकते, दिनकर पतंगे, बापू जाधव, अमित कुलकर्णी
आदी उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील अनेक पदाधिकार्यांची भाषणे झाली. सर्वच नेत्यांनी कार्यकर्त्यांना सन्मान
मिळवून देण्यासाठी आजची बैठक असल्याचे सांगून आमदार विलासराव जगताप हे कार्यकर्त्यांना
सन्मान देत नसल्याची खंत व्यक्त करून त्यांची हुकुमशाही असल्याचे सांगितले.
नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी खासदार संजय पाटील यांना निवङून
आणू व आमच्या गटातील सर्व कार्यकर्ते स्वतंत्र प्रचार करतील, असा होरा त्यांनी व्यक्त केला.
या बैठकीत कार्यकर्त्यांनी, आमदार हे कार्यकर्त्यांना किंमत देत नाहीत, असा आरोप
केला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी व्यासपीठावरच
सर्व कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र कार्यकर्ते
आक्रमक झाले. आम्ही स्वतंत्र प्रचार करू, असा शेवटपर्यंत ठेका ठेवला. यानंतर खासदार पाटील यांनीही
कार्यकर्त्यांना आवाहन केले व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आमदार गटाच्या बैठकीकडे
बोलविले. मात्र या बैठकीकङे सर्वांनी पाठ फिरवली . यानंतर खासदार संजय पाटील, शिवसेनेचे पदाधिकारी आमदार
गटाच्या मेळाव्याकडे रवाना झाले. नंतर आमदार विलासराव जगताप यांच्या
जिजामाता महिला सभागृहात संयुक्त मेळावा आयोजित केला होता.
या मेळाव्यास
खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, आमदार विलासराव जगताप, भाजप जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी महापौर विवेक
कांबळे, मकरंद देशपांडे, सांगलीच्या महापौर
संगीता खोत, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभूते. माजी आमदार दिनकर
पाटील आदी उपस्थित होते. यावेळी प्रमुख वक्त्यांची भाषणे झाली.
यावेळी खासदार संजय पाटील यांनी जत तालुक्यातील म्हैसाळच्या पाण्याचा
प्रश्न संपविण्यासाठी विजयी करण्याचे आवाहन केले. जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी खासदार पाटील यांना दुप्पट लीड देऊन विजयी
करण्याचे आवाहन केले. आमदार विलासराव जगताप यांनी जत तालुक्यातील
सर्वच पदाधिकार्यांनी एकदिलाने काम करून खासदार पाटील यांना
विजयी करू, अशी ग्वाही दिली. यावेळी आमदार
सुधीर गाङगीळ, सुरेश खाडे, विवेक कांबळे,
संजय कांबळे, संजय विभूते, मकरंद देशपांडे यांची भाषणे झाली.
No comments:
Post a Comment