अंनिसचा जिल्हा प्रेरणा मेळावा
जत,(प्रतिनिधी)-
सांगली जिल्ह्यातील अंनिस कार्यकर्त्यांचा प्रेरणा मेळावा संजयनगर सांगली येथे उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यास निरीक्षक म्हणून अंनिसचे राज्य प्रधान सचिव प्रशांत पोतदार (सातारा) उपस्थित होते. यावेळी बोलताना श्री. पोतदार म्हणाले की, अंनिस चळवळीस यावर्षी ३० वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने अंनिसने मुंबई येथे त्रिदशकपूर्ती अधिवेशन घेतले आहे. त्यावेळी अंनिसच्या कार्याचे सोशल ऑडीट केले जाईल. तरूणांचा चळवळीत विशेष सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातील.
राज्य सरचिटणीस संजय बनसोडे यांनी सांस्कृतिक अंगाने प्रबोधन करणेची गरज स्पष्ट केली. प. रा.आर्डे यांनी शालेय विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवून काम करावे अशी सूचना केली. पलूस, कडेगाव, कवठेमहांकाळ या तालुक्यात अंनिसच्या शाखा सुरू करण्याचे ठरले.
यावेळी सांगली जिल्हा अंनिसच्या जिल्हा कार्यकारिणीची निवड निरीक्षक प्रशांत पोतदार यांचे देखरेखीखाली झाली.
या मेळाव्यासाठी सुनिल भिंगे, दिपक खरात, नाना पिसे, प्रभाकर सनमडीकर, इब्राहिम नदाफ,रवि सांगोलकर,अर्जुन कुकडे,संतोष गेजगे,फारूक गवंडी, अमर खोत,लक्ष्मण रनवरे,शिराळाहून डॉ.सुनिल पाटील, चंद्रकांत पाटील, डॉ. संजय निटवे, आशा धनाले, अण्णा गेजगे, डॉ. नितीन शिंदे, बी. आर. जाधव, डॉ.सुरज वाघ उपस्थित होते. आभार राहुल थोरात यांनी मानले. हम होंगे कामयाब एक दिन या गीताने मेळाव्याचा समारोप झाला.
No comments:
Post a Comment