जत,(प्रतिनिधी)-
खलाटी
(ता. जत) येथील खंडू बनसोडे
(वय 20) या युवकावर अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याने
विनयभंग व पोक्सोअंतर्गत गुन्हा जत पोलिसांत दाखल झाला आहे. संशयित
खंडू बनसोडे हा गावातीलच एका अल्पवयीन मुलीची गेल्या सहा महिन्यापासून छेडछाड करत होता.
पीडित मुलगी शाळेस ये जा करताना तिच्याकडे बघून हसणे, तिच्याशी लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याने पीडित मुलीने हा प्रकार घरी
सांगितला. याबाबत संबंधित मुलींच्या वडिलांनी खंडूच्या वडिलांना
याबाबतची माहिती दिली होती. परंतु जाब विचारताच खंडूने बघून घेण्याची
धमकी दिली. शिवगाळ व दमदाटी करून दगडाने मारहाण केली.
No comments:
Post a Comment