Saturday, March 30, 2019

बलशाली भारताठी विद्यार्थ्यांनी गरूडझेप घ्यावी: चिपडे


जत,(प्रतिनिधी)-
येळवी (ता. जत) येथील श्री संत ज्ञानेश्वर आश्रमशाळेत इ. 7 वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ झाला. याप्रसंगी अपयशाने खचून जाऊ नये, अपयश ही यशाची पहिली पायरी असते. प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्यातील गुण शोधावेत, बलशाली भारत घडविण्यासाठी गरुडझेप घेण्याची जिद्द ठेवावी, असे प्रतिपादन बीआरसी तज्ज्ञ मार्गदर्शक चिपडे यांनी केले.

ते पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी परिस्थितीवर मात करत संघर्ष करावा. केंद्रप्रमुख सुखदेव शिंदे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रास्ताविकपर बोलताना प्रशालेचे मुख्याध्यापक शहाजी शिंदे यांनी प्रशालेविषयी माहिती सांगत या प्रशालेत 250 हून विद्यार्थी शिक्षण घेत असून यापैकी 120 विद्यार्थी-विद्यार्थिनी निवासी असून त्यांची योग्य देखभाल व देखरेख असून येथील मुली सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले. यावेळी हुबनुर व कदम; तसेच विद्यार्थी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन अतुल गडदे व आभार अधीक्षक धोत्रे यांनी केले. यावेळी नंदकुमार खंडागळे, गजानन पतंगे, वर्गशिक्षक बाबानगर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment