Monday, March 4, 2019

उमदी पोलिसांनी वाचवले महिलेचे प्राण


जत,(प्रतिनिधी)-
 एका महिलेचे प्राण वाचवल्याबद्दल उमदी पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर व पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सपांगे यांचा सत्कार जत पंचायत समितीचे उपसभापती अॅड. अडव्याप्पा घेरडे यांनी केला. यावेळी महादेव कुंभार, बशीर मुल्ला, हाजीसाब मन्नाभाई, खैरावकर सावकार यांच्यासह टायगर ग्रुप बोर्गीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
माणिकनाळ (ता. जत) येथील महिला उमदीशाईनजबी बंदगीसाब (अजमिसब) मुल्ला (वय 50) या उमराणी (ता .इंडी, विजापूर) येथे सासरी गेल्या होत्या. पतीसोबत त्या माहेरी आल्या होत्या, दोन दिवस राहून सासरी जात होते. मात्र पती-पत्नीत कडाक्याचे भांडण वाटेतच झाले. पतीने तिला वाटेतच सोडून आपल्या गावी निघून गेला. एकटाच घरी आल्याने नातेवाईकांनी चौकशी केल्याने सत्य परिस्थिती समजली. इकडे-तिकडे चौकशी केली असता शोध लागला नाही. लगेच महिलेच्या माहेरच्यांनी उमदी पोलीस स्टेशन गाठले व हरविल्याची फिर्याद दिली. तत्परता दाखवत उमदी पोलीस सहायक उपनिरीक्षक प्रवीण सपांगे यांनी सायबर सांगलीच्या मदतीने 24 तासांच्या आत ती महिला आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असताना तिला शोधून काढले व त्या महिलेचा प्राण वाचवला. जत पंचायत समितीचे उपसभापती अॅड अडव्याप्पा घेरडे यांनी पोलीस सहायक उपनिरीक्षक प्रवीण सपांगे यांचा व नूतन पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर यांचा सत्कार केला. अडव्याप्पा घेरडे म्हणाले, उमदी पोलिसांचे कौतुक करावे तेवढं थोडंच आहे. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य व त्यांच्या कामाचे कौतुक केल्यास ते नवीन उमेदीने काम करतील. तसेच नवीन अधिकारी दत्तात्रय कोळेकर यांनी हातभट्टी व अवैध धंद्यांना लगाम घालावा, जेणेकरून गोरगरिबांचे संसार सुखाने चालतील. अधिकारी प्रवीण सपांगे म्हणाले, महिलेचा जीव वाचवला व त्यांचा संसार नव्याने उभारण्याचे साहसी काम आमच्या सायबर सेल सांगली यांच्या मदतीने झाल्याने आनंद आहे.

No comments:

Post a Comment