जत,(प्रतिनिधी)-
वळसंग
ते कोळगिरी रस्त्यावर वळसंगपासून तीन किलोमीटर अंतरावर आयशर टेम्पो व मोटरसायकलची समोरासमोर
धडक झाली. यामध्ये वळसंगमधील संतोष विजयकुमार कोळी (वय 17) हा तरुण जागीच ठार झाला. या अपघाताची नोंद पोलिसांत झाली आहे.
याबाबत अधिक माहिती
अशी की, वळसंग (ता. जत) मधील संतोष विजयकुमार कोळी (वय 17) हा तरुण मुलगाकोळगिरीहून वळसंगकडे होता,
तर आयशर (एमएच 10 डब्ल्यू
7688) उमदीकडे निघाला होता. भरधाव आयशरने मोटारसायकलला
समोरासमोर जोरदार धडक दिल्याने संतोष आयशरखाली सापडला. त्याच्या
डोक्यावरून चाक गेल्याने तो गंभीर जखमी झाला. घटनास्थळी लोक जमा
होताच आयशर चालकाने पळ काढला. संतोषला उपचारासाठी जतला हलवण्यात
येत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.तो यंदा दहावीत शाळा शिकत
होता. नुकतीच त्याने परीक्षा दिली आहे. अशा तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याने वळसंग परिसरातील नागरिकांतून हळहळ व्यक्त
होत आहे.
No comments:
Post a Comment