Monday, March 25, 2019

दिनकर कुटे यांना डॉ. अ.वा. वर्टी कथालेखक पुरस्कार


(मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतीकराव ढाले पाटील  यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना राजे रामराव महाविद्यालयाचे प्रा.दिनकर कुटे)
जत,(प्रतिनिधी)-
सार्वजनिक वाचनालय नाशिक यांच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा डॉ. अ.वा. वर्टी कथालेखक पुरस्कार राजे रामराव महाविद्यालय, जत येथील मराठीचे प्रा. दिनकर कुटे यांना मराठावाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतीकराव ठाले-पाटील यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप आकर्षक स्मृतिचिन्ह, 5000 रुपये रोख, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ असे होते.

१७८ वर्षाची प्रदीर्घ परंपरा असणार्‍या या ग्रंथालयाकडनू दिल्या जाणार्‍या या पुरस्काराला मराठी साहित्यात विशेष महत्त्व आहे.  या प्रसंगी ठाले-पाटील म्हणाले की, मराठी साहित्य जगतात प्रथितयश कथाकार म्हणून डॉ. अ.वा. वर्टी यांचे स्थान अढळ आहे. यांच्या नावाने दिला जाणारा कथालेखक पुरस्कार दिनकर कुटे यांच्या 'कायधुळ' या कथासंग्रहाला मिळाला  आहे. या वरुन त्यांच्या कथेची उंची समजून येते. मराठी भाषा आणि बोलीला पूर्व वैभव प्राप्त करुन देण्याची जबाबदारी साहित्यिकाबरोबर समाजातील सर्वच घटकांची आहे, हा सन्मान कथेतील व्यथा वेदनांचा असून येथून पुढील काळात माझी जबाबदारी वाढली आहे. याचे भान मला आहे असे  ठाले पाटील म्हणाले. अस्सल माणदेशी बोली आणि येथील संमिश्र जाणिवा 'कायधूळ' या त्यांच्या कथासंग्रहातून अधोरेखित झाल्या आहेत. अल्पावधीतच वाचकांच्या पसंतीस पडलेल्या या संग्रहाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. या कार्यक्रमाला सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर,उपाध्यक्ष किशोर पाठक, नानासाहेब बोरस्ते, कार्याध्यक्ष धर्माजी बोडके,प्रमुख सचिव श्रीकांत बेणी, सहा.सचिव भानुदास शौचे,ग्रंथसचिव बी.जी. वाघ, अर्थसचिव शंकराव बर्वे, सांस्कृतिक कार्यसचिव प्रा. डॉ. शंकर बोर्‍हाडे, अँड. अभिजित बगदे, देवदत्त जोशी, संजय करंजकर,अन्य  पदाधिकारी आणि साहित्य प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments:

Post a Comment