Wednesday, March 20, 2019
कौशल्यावर आधारित शिक्षण आत्मसात केले पाहिजे
उपसंचालक नागेश मोटे
जत,(प्रतिनिधी)-
भारत हा जगामध्ये सर्वात जास्त तरुणांचा देश आहे. पण या तरुणांच्या हाताला आपण काम दिले पाहिजे. आज देशासमोर बेरोजगारीचे आव्हान आहे. हे बेरोजगारीचे आव्हान पेलायचे असेल तर कौशल्यावर आधारित शिक्षण आत्मसात केले पाहिजे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक सेवा संचालनालय मुंबईचे उपसंचालक नागेश मोटे यांनी केले.
ते राजे रामराव महाविद्यालयाच्या पदवी वितरण समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर येथील विवेकानंद महाविद्यालयाचे प्रचार्य डॉ. एस. वाय. होणगेकर हे होते.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही.एस.ढेकळे, विद्यापीठ प्रतिनिधी डॉ. ए. के. भोसले व राजे रामराव महाविद्यालाचे परीक्षा विभाग प्रमुख प्रा.आर .डी.करांडे व्यासपीठावर उपस्थित होते.
ज्ञानामुळे अज्ञान दारिद्र्य कमी होऊन आत्मबल वाढत असते आणि हे आत्मबलच आपणास भावी आयुष्यासाठी सक्षम बनवत असते. सक्षम झालेल्या तरुणांनी सरकारी नोकरीच्या मागे न लागता कॉर्पोरेट क्षेत्रात जी नोकरी मिळेल ती स्वीकारा असे सांगून ते पुढे म्हणाले कि, या महाविद्यालायामुळेच मला क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी मिळाली. आपण ज्या समजामुळे, गावामुळे, महाविद्यालयामुळे घडलो. ज्या मातीत आपण लहानाचे मोठे झालो ,त्या मातीला आपण कधीही विसरू नये असेही ते शेवटी म्हणाले.
यावेळी अध्यक्ष पदावरून बोलताना प्रचार्य डॉ.एस.वाय.होणगेकर म्हणाले कि, ज्या तरुणांमध्ये आत्मविश्वास आहे जे तरुण सक्षम आहेत. अशा प्रत्येक तरुणाला आज मार्केटमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध आहे.पण ज्यांना आपल्या आत्माविश्वासावर विश्वास नाही असे तरुण बेकार आहेत. ज्यावेळी आपण पदवी हातात घेतो, त्यावेळी आपल्या मनामध्ये कोठेही जाऊन काम करण्याचा आत्माविश्वस निर्माण झाला पाहिजे, असे सांगून ते शेवटी म्हणाले कि, राजे रामराव महाविद्यालयाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष व शिक्षण महर्षी डॉ.बापुजी साळुंखे यांच्या जन्मशताब्दीच्या वर्षात या महाविद्यालयात पहिला पदवी वितरण समारंभ होत आहे. हा दुग्धशर्करा योग आहे.आयुष्य खूप सुंदर आहे फक्त आपला दृष्टीकोन सुंदर असला पाहिजे. तुम्ही आयुष्यात कितीही मोठे व्हा. पण त्या बरोबर उत्तम माणूस व्हा. कारण आज माणसातला माणूस हरवत चालला आहे.म्हणून ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार आत्मसात करून आपण माणसातला माणूस जपला पाहिजे. असेहि ते शेवटी म्हणाले.
प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही.एस.ढेकळे यांनी आपल्या प्रास्ताविकात पदवी वितरण समारंभाबाबत माहिती देऊन प्रमुख मन्यवारांचे स्वागत केले. प्रारंभी महाविद्यालयाचा ध्वज व शिवाजी विद्यापीठाच्या ध्वजासह ज्ञान दंडाची मिरवणूक काढून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी ज्या विद्यार्थ्यांनी आपापल्या विभागामध्ये प्रथम तीन येणाऱ्या विध्यार्थाना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सी.वाय.मानेपातील यांनी तर शेवटी आभार प्रदर्शन परीक्षा विभाग प्रमुख प्रा. आर.डी. करांडे यांनी केले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment