शिवसेना महिला आघाडीची निदर्शने
सांगली,(प्रतिनिधी)-
स्वतंत्र
सांगली तालुका घोषित करण्यात यावा, महापालिकेतील बेकायदेशीर पदोन्नती
रद्द करण्यात यावी आदी मागण्यांसाठी शिवसेना महिला आघाडी सांगली शहराच्या वतीने बुधवारी
स्टेशन चौकात निदर्शने करण्यात आली. महिला आघाडी सांगली शहरप्रमुख
मानसी जितेंद्र शहा यांच्या नेतृत्वाखाली सांगलीतील स्टेशन चौकात ही निदर्शने करण्यात
आली.
सांगली तालुका करावा व महापालिका आयुक्तांनी बेकायदा प्रभारी
पदोन्नती स्वतःच्या अधिकारात कनिष्ठ लिपिकास सहाय्यक आयुक्त दी नियुक्ती केली,
याची चौकशी करण्यात यावी व तसेच सांगली तालुका करण्याबाबत या आधीही अनेकवेळा
चर्चा झाली आहे. त्याची अंमबजावणी झालेली नाही. सदरचा सांगली तालुका झालाच पाहिजे, या मागणीसाठी शिवसेना
महिला आघाडीच्या सांगली शहराच्या वतीने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात आले.
यावेळी मानसी शहा सुजाता इंगळे, पूजा मुळके,
सप्नाली कुरलापकर, सुनीता मोरे, सुनीता पाटील, राधिका जयस्वाल, मुमताज मुजावर, दीपा इंगळे, संगीता
जाधव, माया पवार, नीता पवार, अनिल शेटे, जितेंद्र शहा, धर्मेंद्र
कोळी, प्रदीप बर्गे, बजरंग पाटील,
नितीन काळे, सुधीर चव्हाण, प्रकाश लावते, रावसाहेब घेवरे, रावसाहेब खोजगे, प्रसाद रिसवडे, अक्षय सुतार, अरुण चव्हाण, गणेश
भोसले, अनिल पाटील इत्यादी आंदोलनावेळी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment