Monday, March 4, 2019

शहिदांच्या कुटुंबीयांसाठी शिवजन्मोत्सवाचा निधी


जत,(प्रतिनिधी)-
 दहशतवाद्याच्या भ्याड हल्ल्यातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी, संभाजी ब्रिगेड सांगली व बेवनूर शाखेच्या वतीने साजरा केला जाणारा शिव जन्मोत्सव सोहळा साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले, व तो निधी शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मदत म्हणून देण्याचे ठरवले, व संभाजी ब्रिगेड च्या वतीने, शिवजयंतीदिवशी सायंकाळी 5 वाजता बेवनूर गावातून शहीद जवानांच्या कुटुंबीयांना अर्थिक मदत देण्यासाठी मदत फेरी काढण्यात आली.
या मदत फेरीत माजी सैनिक संघटना, शिवबाराजे फौंडेशन, जय शिवराज ग्रुप, एकता फौंडेशन, राजमाता अहिल्यादेवी ग्रुप, तसेच विविध सामाजिक संघटना, विविध पक्षांचे कार्यकर्ते, महिला, शालेय विद्यार्थी, सहभागी झाले. एकवीस हजार शंभर रुपयांचा निधी, विठुरायाचीवाडी येथील शहीद झालेले जवान राहुल करांडे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांना, त्यांच्या पत्नी अश्विनी राहूल करांडे, व त्यांच्या आई यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी डॉ़ सुधीर नाईक, विश्वासराव देशमुख, तानाजी सरगर, पोलीस पाटील महादेव शिंदे, श्रेयश नाईक, भोजलिंग काळेल, जगदीश मोरे, महादेव देवकर, विलास काळेल, सरपंच, व ग्रामस्थ उपस्थित होत

No comments:

Post a Comment