निसर्गचक्राची परिक्रमा करताना अखेरचा मास
फाल्गुनपाशी पाय आपोआपच रेंगाळतात. याचं कारण त्याचं मुग्ध रुप. सृष्टीच्या
तारुण्याचा बहर म्हणजे फाल्गुन! कोणत्याही माणसाला तारुण्याच्या चीर आठवणींचं
स्मरण करुन देणारा असा हा मास आहे. आत्यंतिक प्रणय आणि पराकोटीचा शोक हे
तारुण्याचं वैशिष्ट्य असावं. फाल्गुनातील एखाद्या दुपारी निसर्गाकडे पाहत बसलं की
आपोआप तारुण्यातील ऐन बहराच्या आठवणी मनात पिंगा घालू लागतात. गेलेल्यांच्या
स्मरणानं मन घायाळ होतं. प्रौढ वयातही डोळ्यातून आसवं ठिबकायला लावण्याचं
धारिष्ट्य या महिन्यात आहे. त्यामुळेच ऋतुचक्राच्या या अखेरच्या महिन्याशी
रेंगाळण्याची मौज काही आगळीच ठरते.
सृष्टीचा भर
तारूण्याचा बहर म्हणजे फाल्गुन!मस्त मनमौजी सदातरूण असा फाल्गुन! पौषाची धुसरता, माघाची अबोलता, निस्तब्धता
सारं काही संपून पूर्ण तारूण्याचा रंगीला फाल्गुन! कोणत्याही मनुष्याला सुनहर्या
तारूण्याची चिर आठवण करून देणारा हा निसर्ग तसाही मायावीच आहे. त्याच्या प्रेमात
त्याने आजवर अनेक कवीवरांना, लेखकांना भारून ठेवलं आहे.
माणसाच्या स्वभावाप्रमाणे प्रत्येक स्वभावाची छाया निसर्गत: मिळते. वसंतोत्सवासाठी
मंदिराकडे जाणारी पहिली पायरी म्हणजे फाल्गुन. नंतर चढत्या क्रमानं सुखाकडे,
प्रणयाकडे वाटचाल करणारे सृष्टीच्या भर तारूण्यातल्या बहराचे दिवस
क्षणात प्रखर उन्हानं कासावीस करणारे तर क्षणात थंडगार वार्याची शितलता, प्रदान करणारी, प्रणयाच्या ऐन उन्मादाच्या क्षणीही
संयमित कालपूर्ण आनंदठेव म्हणून जपणारे हे पक्षी जणू काही असाच संदेश आपल्याला
देतात की, आयुष्यातला आनंदाचा ठेवा मनमुराद लुटा, पण मनावरचा ताबा कोणत्याही परिस्थितीत सुटू देऊ नका. आत्यंतिंक प्रणय आणि
पराकोटीचा शोक हे फाल्गुनाचं स्वभाव वैशिष्ट्य असावं, असं
वाटतं. दुपारच्या गंभीर, शांत वातावरणात आठवणीत गेलेल्यांचं
स्मरण दुखावतं. असं वाटतं की, ही शांत दुपार जणू भूतकाळाचं
स्मरण करावं यासाठीच आहे. झाडांची पानगळ सुरू असली तरी नादरहित असते. स्मरणातून
जवळ येणारे किंवा असणारे हे क्षण ही दुपार घेऊन येते. कोवळे भावबंध अजून तरल आणि
पारदर्शक करते. प्रौढ वयातसुध्दा डोळ्यात पाणी जमा करण्याचं धारिष्ट्य दाखवतं.
अंगणातल्या झोपाळ्यावर बसावं आणि खुशाल आठवणीत रमावं. नवा झोका उंच जातो तेव्हा जे
आयुष्यात येवू शकले नाहीत त्यांना हात लांब करून आपल्याकडे ओढावं. त्यांची इच्छा
असली तर एक झोका त्यांच्यासवे झुलावा आणि पुन्हा भानावर यावं. सुंदर संध्याकाळ दुपारच्या विरहाचा मागमूस नाहीसा करते. म्हणूनच वाटतं की,
आचंबिक ओढ आणि आत्यंत्यिंक विरह हीच खरी फाल्गुनाचं स्वभाव
वैशिष्ट्य असावीत. सार्या दुपारभर जाणवलेला मना-शरीरावर पसरलेला उदासपणा
संध्याकाळी कमी होऊ लागतो. पाखरांच्या गळ्यातून झिरपणारे स्वर, पंखांच्या फडफडण्यातून निर्माण झालेले स्वर संगीतात आपोआप मिसळतात.
झाडाझाडांतून पुढे येणार्या वसंताच्या आगमनाची वर्दी देतात. पण या सार्यासाठी
दुपारचे विरहीपण भोगावंच लागतं. जितकं आपण निसर्गाच्या जवळ जातो तितका तो
आपला सखा बनतो. प्रत्येकाच्या स्वभाव वैशिष्ट्याचं चित्रण निसर्गात आढळतं. म्हणून
ईश्वराला महान जादूगार म्हटलं जातं. विविधतेत एकता असते. साधारणत: शहरीकरणामुळे
वृत्तीत फरक पडला. पण मनाचा गाभा,अंर्तनादातला निसर्ग जागाच
राहीला. जगण्याला कोवळीक देत गेला. म्हणूनच कितीही कार्यमग्न असलं तरी तुबदलांची
जाणीव व्हायला एक लहानशी वार्याची झुळुक देखील पुरेशी असते. स्वत: येऊन निसर्गाशी
आपल्या नात्याची विण पुन्हापुन्हा गुंफते. रानोमाळ
फुललेला पळस स्वत: विरागी रंग जरी धारण करित असला तरी प्रेमीजनांना आपल्या रंगात
रंगवून टाकतो. याच्या केशरी फुलांचा पाण्यात भिजवून रंग तयार करतात आणि तो रंग
आपल्या आवडत्या व्यक्तीवर उधळतात. त्यात एक वेगळीच खुमारी असते.
No comments:
Post a Comment