Monday, March 25, 2019

दुष्काळावर मात करण्यासाठी एकदिवसीय कार्यशाळा संपन्न


जत,(प्रतिनिधी)-
सध्या जत तालुक्यात भीषण दुष्काळचा सामना करावा लागत आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी व दुष्काळ हद्दपार करण्यासाठी पाणी फौंडेशनच्या वतीने माडग्याळ व उमदी येथे एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. जत तालुक्यात पाणी टंचाई ने नागरिक हैराण झाले आहेत. सर्व तलावे,विहिरी, कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत. जनावरांना चारा मिळेना झाला आहे. पाणी व चार्याअभावी पशुपालक चिंतेत आहे. यांचे हाल दूर करण्यासाठी पावसाचे पाणी जमिनीत मुरले पाहिजे.पाण्याची पातळी वाढली पाहिजे, यासाठी पाणी फौंडेशनच्या माध्यमातून एकदिवसीय कार्यशाळा उमदी व माडग्याळ येथे घेण्यात आली.

यावेळी उमदी सरपंच वर्षा शिंदे,उपसरपंच रमेश हळके,माडग्याळ सरपंच आप्पू जत्ती, उपसरपंच मल्लू धुमाळे, सदस्य साधना सावंत,निवृत्ती शिंदे,सुरेश कुललोळी,पांडुरंग सावंत, बाळू कोरे, व्हनाप्पा माळी सहित महिला,विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी निवृत्ती शिंदे म्हणाले,गावातील सर्व नागरिकांनी दुष्काळ हटवण्यासाठी पाणी फौंडेशनच्या माध्यमातून काम करूया. यावेळी पाणी फौंडेशनचे ट्रेनिंग घेऊन आलेल्या महिलांना साडी व टॉवेल टोपी देऊन निवृत्ती शिंदे यांनी प्रोत्साहनपर सन्मान केला तर सुरेश कुललोळी यांनी कामाला लागणारे खोर्या,पाटी,बेडग सर्व साहित्य देण्याचे वचन दिले. यावेळी पाणी फौंडेशनचे तालुका समन्वयक तुकाराम पाटील व त्यांच्या सहकार्यांनी मार्गदर्शन केले

No comments:

Post a Comment