जत,(प्रतिनिधी)-
दुष्काळी
जत तालुक्यात भयावय परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत
दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात द्यावा, यासाठी भुयारी मठाचे मठाधिपती
तुकाराम महाराज यांनी पुढाकार घेतला आहे. जत तालुक्यात
250 पाण्याच्या टाक्यांचे वाटप करून तुकाराम महाराज यांनी संख येथे मोफत
चारा छावणी सुरु केली आहे.
टोणेवाडी येथे पाण्याच्या टाकीचे वाटप
करताना तुकाराम महाराज यांनी दुष्काळग्रस्तांना सहकार्य करू, अशी ग्वाही देत या तालुक्याचा दुष्काळ कायमस्वरूपी नाहीसा करण्यासाठी प्रयत्नशील
असल्याचे सांगितले. येळवी येथील कृष्णप्रकाश गुरुकुल करिअर अकॅडमीने
याठिकाणी हि पाण्याची टाकीचे वाटप करण्यात आले. यावेळी मारुती
मदने, गजानन पतंगे, विजय रुपनुर,
विरपाक्ष येवले, नितीन टोणे, व टोणेवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments:
Post a Comment