Friday, March 8, 2019

सर्व क्षेत्रात विद्यार्थी परिपूर्ण असावा :तुकाराम महाराज


जत,(प्रतिनिधी)-
 आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे राहता कामा नये. त्यासाठी मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. येळवी येथील कृष्णप्रकाश गुरुकुल करिअर अकॅडमीने केलेली ही सुरुवात आदर्शवत आहे. ग्रामीण भागात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, तसेच मातृपितृसेवेसोबत आध्यात्मिक ज्ञानदान ही काळाची गरज असून सर्व क्षेत्रात विद्यार्थी परिपूर्ण असावा, असे प्रतिपादन चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम महाराज यांनी केले.
येळवी (ता. जत) येथील एकलव्य बहुउद्देशिय सेवाभावी संस्था संचलित कृष्णप्रकाश गुरुकुल करिअर अकॅडमीच्या वतीने कोल्हापूर येथे झालेल्या आर्मीच्या भरती टेक्निकल विभागात या अकॅडमीचा विद्यार्थी समाधान घुंबरे, तसेच एनएमएम परीक्षेत जतमध्ये प्रथम आलेला उमेश वाणी, आदर्श शिक्षक दत्तात्रय धोत्रे, आदर्श शिक्षिका सुनीता हिले, जयश्री चव्हाणव्हनखंडे, आदर्श माता-पिता भालचंद्र गडदे, आदर्श लिपीक मदगौंडा मेडीदार या गुणवंतांचा सत्कार व सन्मान सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी असणारे राजुरी येथील गुरुकुल विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष तथा उद्योगपती महादेव बाड म्हणाले, शिक्षणातून परिवर्तन घडत, तरुण कर्तबगार यांनी व्यवसाय, उद्योगधंदे उभा करावेत. शिक्षणासाठी पैसा लागत नसून जिद्द व चिकाटी काहीतरी करून दाखवण्याची उमेद असावी. येळवीचे सरपंच विजयकुमार पोरे, उपसरपंच सुनील अंकलगी, संचालक शंकर आवटे, जिव्हाळा ग्रुपचे अध्यक्ष डॉ. समाधान जगताप, मुख्याध्यापक धोंडाप्पा तेली, ओंकारस्वरूपा फौंडेशन संस्थापक अध्यक्ष दीपक अंकलगी, अष्टविनायक फ्रेंड्स ग्रुपचे संस्थापक अविनाश पोरे, ग्रामपंचायत सदस्य संतोष पाटील, डॉ. नरळे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविकपर भाषणात बोलताना कृष्णप्रकाश अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर आवटे म्हणाले, 2009 साली स्थापना झालेल्या कृष्णप्रकाश अकॅडमीने गुणवंत खेळाडू घडवित एक नवा इतिहास घडविला आहे. भविष्यातही अनेक महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्याची अशी ग्वाही दिली. सूत्रसंचालन मुख्याध्यापक भारत क्षीरसागर यांनी केले. यावेळी लक्ष्मण आवटे, शिवाजी आवटे, रामहरी आवटे, मुख्याध्यापक भारत क्षीरसागर, श्रीकांत सातपुते, महेश मालगत्ते, यांची उपस्थिती होते.

No comments:

Post a Comment