Saturday, March 2, 2019

सोनलगीतील तिघांना सक्तमजुरी : जत न्यायालयाचा निर्णय


जत,(प्रतिनिधी)-
 सोनलगी (ता. जत) येथे शेत जमिनीच्या वादातून एकास मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी तिघांना साडेतीन वर्षे सक्तमजुरी व दंडाची शिक्षा जत येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस .आर. पाटील यांनी सुनावली, शब्बीर नबीसाब चांद कर, महबूब नबीसाब चांदकर, शबाना शब्बीर चांदकर (सर्व राहणार सोनलगी ता. जत) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत.
या प्रकरणी रमजान साहेब अन्सर बरडोल यांनी फिर्याद दिली होती. शब्बीर नबी साब चांदकर, महबूब नबीसाब चांदकर, शबाना कबीर चांदकर व रमजानसाब बरङोल यांच्यात शेत जमिनीचा वाद होता. या वादातून 23 नोव्हेंबर 2012 रोजी रात्री नऊच्या दरम्यान शब्बीर चांदकर शबाना व महबूब यांनी रमजान साहेब यांना शेतात ओढत नेऊन काठी, बँटने मारहाण करून गंभीर जखमी केले होते. या घटनेत रमजान साहेब यांचा एक पाय गुडघ्याखाली मोडला व पायाच्या बोटाला गंभीर दुखापत झाली होती. दरम्यान रहीमन बी मौलासाब मुळेकर यभांडण सोङविणेस गेले असता त्यांनाही शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. रमजानसाब बरडोले यांनी पोलिसात तिघांच्या विरोधात फिर्याद दाखल केली होती पोलिस हवालदार टी.एस. चौगुले यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील संतोषकुमार पताळे यांनी आठ दिवस साक्षीदार तपासले त्यांच्या साक्षी ग्राहक म्हणून न्यायालयाने तिने आरोपींवर आरोप निश्चित करून शिक्षा सुनावली तसेच रमजानसाब यांना मारहाणी प्रकरणी नुकसान भरपाई देण्यात यावी असा निकाल न्यायालयाने दिला.

No comments:

Post a Comment