Wednesday, March 6, 2019

विशेष मोहिमेत 5803 नवमतदारांची नोंदणी


सांगली,(प्रतिनिधी)-
 जिल्ह्यात 2 3 मार्चला राबवण्यात आलेल्या विशेष मतदान नोंदणी मोहीमेत 5803 मतदारांची नोंद झाली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज असून 8 मार्च रोजी मशीन प्रात्यक्षिकासाठी सर्वपक्षीय बैठक, तसेच कायदा व सुव्यवस्थाबाबतची बैठकही आयोजित केल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी पत्रकार बैठकीत दिली.
जिल्हाधिकारी चौधरी यांनी पत्रकारांशी बोलताना निवडणूक तयारीबाबत सविस्तर माहीती दिली. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्ह्यात 2 3 मार्चला विशेष मोहीम राबवण्यात आली. यामध्ये 2 मार्चला 1762, तर 3 मार्चला 4041 असे 5803 नवमतदारांची नोंद झाली. निवडणूक घोषणा झाल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दहा दिवसांपूर्वीपर्यंत मतदानाची नोंदणी करता येणार आहे. निवडणुकीसाठी आवश्यक सर्व मशीन निवडणूक शाखेकडे प्राप्त झाल्या आहेत. व्हीव्हीपॅड मशिनचे प्रात्यक्षिक सर्वांना दाखवण्यात येणार असून त्याकरिता 8 मार्च रोजी सकाळी 11 वाजता सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेसंबधातही बैठक 8 मार्च रोजी बोलावली आहे. बैठकीस जिल्हा पोलिसप्रमुख, डी.वाय.एस.पी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांना बोलावले आहे. परवानाधारकांकडील शस्त्रे जमा करण्याची कार्यवाही दोन दिवसांत सुरू केली जाईल.

No comments:

Post a Comment