Sunday, March 31, 2019

जतमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार अनिकेत माने हद्दपार


जत,(प्रतिनिधी)-
लोकसभा निवडणुकीमध्ये संभाव्य अनुचित घटना व प्रकार घडू नये याची दक्षता घेत उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या आदेशान्वये जत शहरातील अनिकेत ऊर्फ पाँडी अशिक माने (वय 23) यास सांगली व सोलापूर जिल्ह्यांमधून प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून तीन महिन्यांकरिता हद्दपार करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की- अनिकेत ऊर्फ पाँडी माने यांच्यावर जत पोलिसांत चार गुन्हे नोंद आहेत. अवैध दारू विक्री, जुगार अड्डा चालवणे, मारामारी आणि शासकीय कामात अडथळा यासारखे गुन्हे नोंद आहेत. याचा विचार करून व संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी जत पोलिस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईकरिता जत पोलिसांनी प्रांताधिकारी यांच्याकडे हद्दपारीचा प्रस्ताव पाठवला होता. त्यानुसार हद्दपारीचा आदेश प्रांताधिकारी यांनी काढला आहे.
या आदेशाची जत पोलिसांनी अंमलबजावणी करत सातारा जिल्ह्यात अनिकेत यांच्या नातेवाईकांकडे सोडले. सदरची कारवाई पोलिस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक माने, पोलिस नाईक उमर फकिर यांनी ही कारवाई केली. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जत पोलिस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर ठोस कारवाई करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment