Wednesday, March 6, 2019

डफळापूर येथे सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन


जत,(प्रतिनिधी)-
 डफळापूर (ता. जत) येथे बहुउद्देशीय सांस्कृतिक इमारतीचे भूमिपूजन हिवरेबाजारचे आदर्श सरपंच पोपटराव पवार यांचे चिरंजीव प्रशांत पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी सभापती मन्सूर खतीब, उपसरपंच प्रताप चव्हाण, डी. आर. पाटील, विलास माने, शंकर गायकवाड, जे. के. माळी, बंडू चव्हाण, दिग्विजय माने, विठ्ठल कोळी, संदीप चव्हाण, भानुदास गडदे व ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य ग्रामसेवक एस. एस. कोरे कर्मचारी उपस्थित होते. येथील पशुवैद्यकीय दवाखानालगत भव्य सांस्कृतिक भवनाची इमारत उभी होणार आहे.
त्यासाठी पंचवीस: पंधरा जिल्हा नियोजन व 14 वा वित्त आयोग या निधीतून प्राथमिक उपलब्ध झाला आहे संपूर्ण इमारतीसाठी सुमारे 50 लाख खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी ही निधीची तरतूद पुढील टप्प्यात केली आहे. व्यावसायिक पद्धतीने या भवनाची इमारत व सुख-सुविधा येथे उपलब्ध केल्या जाणार आहेत. खाजगी तत्त्वावर अल्प भाड्यात गावातील नागरिकांना हे भवन भाड्याने शक्य होणार आहे त्यातून मिळालेल्या भाड्यातून ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. यामध्ये विविध विकासात्मक कामांची माहिती यावेळी प्रसन्न पवार यांना देण्यात आली. गावाच्या विकासात हिवरेबाजारच्या धर्तीवर विकास आराखडा तयार करून शासकीय विविध प्रकारचा निधी उपलब्ध करुन देण्यात आदर्श सरपंच पोपटराव पवार यांच्या माध्यमातून प्रयत्न करू, अशी हमी यावेळी प्रसन्न पवार यांनी दिली.

No comments:

Post a Comment