जत,(प्रतिनिधी)-
जीवनामध्ये
खरा शास्वत आनंद प्राप्त करायचा असेल, तर ईश्वरप्राप्तीशिवाय पर्याय नाही. ईश्वरप्राप्तीनेच मनुष्य जीवन आनंदी, सुखमय, समाधानी बनू शकते, असे प्रतिपादन संत निरंकारी मंडळ शाखा,
कोसारी यांच्यावतीने आयोजित विशाल सत्संग कार्यक्रमामध्ये संत निरंकारी
मंडळाचे प्रचारक सचिन झेंडे (मुंबई) यांनी
केले.
ते पुढे
म्हणाले की, संसार हा वर्तुळाच्या गोलासारखा गोलाकार असून तो
एकदा सुरु झाला की संपत नाही. जीवनामध्ये उपलब्ध असलेल्या गोष्टींमध्ये
समाधान न मानता इतरांच्या बरोबर तुलना करून मनुष्य आपले सुख गमावून बसलेला आहे.
आज या सांसारिक जगामध्ये मानवाला या सगळ्या भौतिक गोष्टीतून बाहेर कडून
एका प्रभू परमात्म्याची ओळख करून देऊन मानवाला एका धाग्यांमध्ये जोडण्याचे महान कार्य
आजच्या युगाला सद्गुरु माता सुदीक्षा महाराज करीत आहेत. त्यांची
शिकवण अमलात आणून आपण आपले जीवन सुखमय करावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमास प्राध्यापक सुरेश पोळ, सतीश काटकर,
सागर माने, विजय टेंगले, सुरेश कोळी, विठ्ठल कोटे, देवदास
जगताप, दत्ता कावरे यांनी सुंदर अशा गीतविचारांमधून मानवाचे नेमके
हित कशामध्ये आहे, हे समजावण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमास मुंबई, सांगली, सोलापूर,
कोल्हापूर जिल्ह्यातून भाविक भक्त उपस्थित होते. सूत्रसंचालन जालिंदर जाधव यांनी केले.
No comments:
Post a Comment