Saturday, March 2, 2019

रेडीमेड पत्रावळ्यांमुळे मांसाहाराची लज्जतच संपली


जत,(प्रतिनिधी)-
 सध्या यात्रांचा हंगाम सुरू असून ऐन उन्हाळ्यात मांसाहार खवय्यांची गर्दी गावागावांत होत आहे. मात्रपूर्वी जेवणासाठी वापरण्यात येणारी पितळी व स्टीलच्या ताटांची जागा रेडीमेड प्लास्टिक ताट- वाट्यांनी घेतल्याने यात्रेतील जेवणाची मजा पूर्णपणे नाहीशी झाली आहे. कुस्करून खाणे,रस्सा पिणे यावर मर्यादा आल्या आहेत. 

 शेतीची कामे उरकली कीगावोगावी यात्रांचा हंगाम सुरू होतो. या निमित्ताने मित्र,पै-पाव्हणे यांची रेलचेल सुरू होते. आपल्या लोकांना यात्रेला बोलावून जेऊ घालण्यात एक वेगळेच आध्यात्मिक समाधान असते. मात्र अलीकडच्या काही वर्षात परिस्थिती काहीशी बदलली आहे. जेवताना वापरण्यात येणारी पितळ किंवा स्टीलची भांडी आता गायब झाली आहेत. त्यांची जागा रेडिमेड ताटांनी घेतली आहे. 
या रेडीमेड प्लास्टिक ताटात जेवणतेही यात्रेतील मांसाहारसमाधानाने होत नसल्याने खवय्ये व पैपाहुणे नियोजनबद्ध जेवण व्यवस्था होत असलेल्या ठिकाणी जाणे पसंत करत आहेत. पूर्वी यात्रेसाठी जेवणासाठी येणार्‍या मित्र परिवारपाहुणे यांना पितळीत मटण व रस्सा वाढला जायचा. त्याला लाकडाची सोबणी ताटाला लावायला असायचीत्यामुळे यात्रेत जेवणारे मनसोक्त भोजन करायचे. सध्या घरातील महिला भाकरी थापून व इतर कामे करुन थकत असल्याने जेवणाची भांडी घासणे जिकरीचे होऊ लागले आहे. पूर्वी प्रमाणे महिलांना घरकाम करण्याची सवय कमी होत चालल्याने आता यात्रा काळातल्या भोजनावळींवर मर्यादा येत आहेत. त्यामुळे ताटाची जागा प्लास्टिक पत्रावळ्या व अन्य साहित्यांनी तयार केलेल्या रेडीमेड ताटांनी घेतल्याने जेवण झाल्यानंतर ताटे टाकून दिली जात आहेत. 
 या प्रकारामुळे प्रदूषणात वाढ होत असली तरी महिलांना त्रास मात्र कमी होत आहे. अनेक यात्रेत भांडी घासणेधुणे यासाठी महिलांची मदत घ्यावी लागते. शेकडो माणसे ज्या घरी यात्रेत जेवणासाठी येतात,तेथील नियोजन करणे संबंधिताला अवघड जाते. मात्रतरीही पितळीतला रस्सा व प्लास्टिकच्या वाटीतला रस्सा यात खूपच फरक पडला आहे. दिवसेंदिवस यात्रेतील अशा भोजनावळीने मजा कमी कमी होत चालली असून यात्रा म्हणजे मद्यपानाचे ठिकाण  बनले आहे. अनेक जण केवळ मद्य प्राशनासाठीच यात्रेकडे पाहू लागले आहेत. यामुळे दिवसेंदिवस यात्रेच्या गावात अपघाताचे ,वादविवाद,भांडणे यांचे प्रमाणही वाढले आहे. दिवसा व रात्रीही भोजनासाठी जाणारे मद्य प्राशन करुन भरधाव वाहन चालवून स्वत:चा व इतरांचाही जीव धोक्यात घालत आहेत.

No comments:

Post a Comment